5 सप्टेम्बर 2017 रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रामविषयी
चर्चा करतांना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ...
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
![]() |
| जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ |
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि ह्या जिल्ह्याला लाभलेली निसर्गसम्पदा ह्याकरीता जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील घनदाट वृक्षवल्ली आणि पर्यावरण पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. येथील निसर्गसम्पदेत भर घालता यावी म्हणून कृषी दिनाचे औचित्य साधून जागृत युवा मंचने तब्बल दोनशे रोप लावून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनास गती दिली आहे.दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषता निसर्गसम्पदेचा -हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानात देखील बदल होत आहे. ह्या सर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे रूतूमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करून समृद्ध व सम्पन्न गावाची भौगोलीक निर्मिती करने ही काळाची गरज ओळखून जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वृक्ष, औषधोपयोगी व फळ वृक्षांना वृक्षारोपणात प्राधान्य देण्यात आले. त्यामधे सीताफफळ,आवडा,पेरू, जाम्बुळ, करंजा,गोडनीम,कडूनीम,बेहेडा,सीसम, ई प्रजाती होत्या.सार्वजनिक स्थळी,चर्च, महावीध्यालय, मंदिर,दवाखाना, बगीचा ई. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून "एक घर एक झाड" ही संकल्पना रुजवत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत:च्या घरी लावण्यासाठी प्रेरित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे ह्या संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दुणावला आणि झाडे लावा उपक्रमासाठी मोठ्या संख्येने युवांचि गर्दी जमली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉरेन्स चर्च नागेपल्लीचे फॉदर स्टेफीन,श्रीराम मंदिर आलापल्ली येथील मडावी महाराज, असीसी सेवा सदन हॉस्पिटल आलपल्ली येथील कर्मचारी, सेंट फ्रँसेस स्कूल अलापल्ली येथील प्रिंसिपल सिस्टर स्नेहा, ग्रीनलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षकवृंद, गोंडवाणा कृषी विद्यालय नागेपल्ली येथील प्रा. वरेकर, जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, युवा विकास संस्थेचे रुपेश गावडे, रवि गज्जलवार, विजेंद्र शील, विजय गड्डमवार, खुशाल शील, साजन उईके, विपुल शील,आकाश पेंदोर,मनोज गेडाम, राहुल सडमेक, कु निशा खोब्रागडे, शीवानी बिश्वास, सोनाली भट, मोनिका मुरमूरवार, कोमल सिंह, रानी उईके,पायल कोडापे आदि जागृत युवा मंचच्या शिष्टमंडळानी सहकार्य केला.