चंद्रपूर ते वळसा प्रवास करत असताना 'ती' नेहमीच ट्रेन मधे भेटायची. अंगावर फाटका पातळ, एक चीरोटी डोक्याला बांधलेली, पोटाला भाकर आणि अंगावर कापड मिळाव म्हणून कुणी दोन पैसे देईल, ह्या अपेक्षेने एका डब्यातून दुसऱ्या डब्यात तिचा प्रवास सुरु असायचा. ती कुष्टरोगी असल्यामुळे एकेकाळी आमटे दाम्पत्याशी उपचारादरम्यान तिची नाळ जोडल्या गेली होती. मीही नेहेमीचा प्रवासी असल्यामुळे तीच्या हातात दहा पाच रूपये देऊन मला मोकळ होता यायचे. अशाच गाटि भेटितून झालेली तिची माझी ओळख.!
ती कधी वेळ काढून जवळ बसायची आणि आपल्या कुटुम्बाविषयी सांगत बसायची. परवा भेटली तेंव्हा डोळ्यात पानी घेउन उरातल दुखः सांगत होती, सहन करतेय म्हणे स्वतःच्या तब्वेतीचा स्वतःलाच होणारा त्रास..! तीच दुखः तुमच्या आमच्या पेक्षा काही वेगळं नसलं तरीही वेगळंच म्हणवून घ्याव लागेल. ''आता नाही करवून होत हे सारं. त्रास होत अश्या जगण्याचा'', ती सांगत होती . सकाळी सहा वाजता तिची दिनचर्या सुरु होते आणि संध्याकाळी सहा वाजता ती घरी परतते. ती बोलली, ''ये एकदा मझ्या घरी.. भिकारडीण म्हणून येऊ नकोस तर आजी म्हणून ये.'' तिने तीच नाव सांगितल आणि आपल्या गावचा पत्ता दिला. तीच नाव जनाबाई मु. पो. कान्पा, भंडारा जिल्ह्याच्या सीमेलगत हे गांव आहे आणि ह्याच गावच्या पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी जमातीतली 'ती'.!
काल दि 9/11/2019 ला आम्ही तिला भेटायला गेलो तेंव्हा ती घरी नव्हती, तीच कुटुम्ब होत. उदरनिर्वाहासाठी तीच विभक्त कुटुम्ब 'फोटो फेम' करून देण्याचा धंदा करतो. त्यामुळे त्यांना सतत स्थलांतरित रहावं लागतं. गरीब असली तरी काही माणस माणुसकी आणि संस्कृती विसरत नाही, ह्याचा अनुभव आम्हाला काल आला. तिला भेटण्यासाठी सकाळी 10 वाजता चंद्रपूरवरून निघालेली आमची जागृत युवा मंचची टीम 12 वाजता पोहचली. घरात काटकसर सुरु असताना त्यांनी चहा ठेवला आणि भर दुपारी जनाबाईच्या मुलगा आणि सूनेनी जेवणाची व्यवस्था केली. हे करताना त्यांचा चेहऱ्यावर आनंद उमटून दिसत होता. संध्याकाली 6 वाजता जनाबाई परत आली तेंव्हा जागृत युवा मंचच्या टीमला तिथे बघून ती भवनावश झाली. तिच्या कुटुम्बियांना आम्ही कपडे देऊन सांत्वन केले.
टेम्पा येथील आदिवासी पाड्यातील लहान मुलामुलींना कपड्यांची गरज आहे, अशी जनाबाईची सातव्या वर्गात शिकत असलेली नात सांगत होती.. परत एकदा जागृत युवा मंचची टीम नक्की जाणार आहे, त्यांच्या आनंदासाठी आणि आमच्या समाधानासाठी !
जागृत युवा मंच विषयी जाणून घेण्याकरिता jagrutyuvamanch.blogspot.com येथे भेट द्या.
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९
कुष्टरोगी जनाबाईच्या कुतुम्बीयांचे जागृत युवा मंच कडून सांत्वन
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)