सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

विडियो पहा



ह्याला जवाबदार कोण..?

आज (दि.25/9/2017) रात्रौ 10:30 वाजता मी आलापल्ली वरून अहेरीला यायला निघालो. मी दुचाकीने प्रवास करत होतो आणि त्यावेळेस माझा मित्र माझ्या सोबत होता. प्रवासात नागेपल्ली ह्या गावाच्या मध्यरस्त्यावर एका गायीचे वासरू घायाळ परिस्थितीत पडलेले आढळून आले. आम्हाला त्याची काही मदत करता येईल का ह्या उद्देशाने आम्ही बाईक थाम्बवली. त्याच्या शरिरावर गम्भीर दुखापत झाली होती.अपघात कुण्या अज्ञात चारचाकी वाहनाने झाला असावा हे त्याच्या जखमावरून सहज तर्क लावता येत होतं. हॉस्पिटलमधे नेण्याकरीता मदत लागेल म्हणून मी माझ्या मित्रांना फोन करत असतानाच त्याच्या शरिरावर झालेली जखम त्याला असाह्य झाली आणि आमच्या डोळ्यांदेखत त्याचा जीव गेला...!
ही घटना तुमच्या आमच्या साठी काही नवीन नाही; पण विचार करायला भाग पडणारी घटना आहे. घडलेल्या प्रसंगांवरून एक नजर फेरली की आपल्या सहज लक्षात येतं आणि आपोआप एक प्रश्न उभं रहातं, "ह्याला जवाबदार कोण ?" आपल्या गुरांची जवाबदारी न स्विकारता दुर्लक्ष करणारे त्यांचे मालक, की कोंडवाळा न बांधता त्यांना मोकाट फिरायला भाग पाडणारे ते स्थानिक प्रशासन..? रस्त्यावर बाजार करून बसलेली ती निष्पाप, नासमझ जनावरं की, त्यांचा जराही विचार न करता त्यांना तुडवून पुढे निघून जाणारे स्वतः आपण ? असो.! तो गेल्यावर एका गाईच्या संवेदना जाग्या झाल्या आणि ती त्याला आपल्या जीभेने चाटत होती, तो गेल्याचं तिलाही कळलं असेल कदाचित ! त्यांच्या कुटुम्बाची अवस्था बघून काही क्षणासाठी का होईना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. कारण ती गाय असली तरी एका वासराची माय होती. आम्ही त्याची मदत करू शकलो नाही ह्याच दुःख होतय. ह्याला जवाबदार कोण ? दोष कुणाला द्याव ? हे माला कळत नाही. पण आपणा सर्वाना एक विनंती करतो. वाहने हळु चालवा, आपल्या हातून कुणाचा अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्या. जगा आणि जगू दया. कुणास ठाऊक, कुणीतरी कुणाची आतुरतेने वाट बघत असेल..

-राहुल पी. पेंढारकर