
-नागरीकामध्ये तिव्र आक्रोश वनाधिका-याचे धाबे दणाणलले
-आंदोलनातील ढोल बजाव गडचिरोली कराना ठरला आकर्षणाचा व चर्चेचा विषय
भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन,सर्वपक्षीय,ग्रामपंतायती,व परीसरातील जनतेच्या वतिने
गडचिरोली जिल्ह्यात माणसावर हल्ला करीत प्रंचड धुमाकुळ माजविणा-या नरभक्षक वाघाने वनविभाग वडसा आणि गडचिरोलीच्या वनव्याप्त कार्यक्षेञात व शेतकरी बांधवाच्या शेतालगत जवळपास 14 निप्षाप माणसाचे बळी घेतले.अनेक व्यक्तीना वाघाने हल्ला करुन जखमी केले.एवढेच नव्हे तर अनेक शेतकरी कुटू्बातील गाई,म्हशी,बक-या फस्त केल्या ज्या मुळे परीसरातील जनता नरभक्षक वाघाच्या दहशतीत पुर्णपणे भयभित झाली असुनअनेक शेतकरी बांधव आपल्या शेतावर जाणे बंद केले.व परीसरातील नागरीक घराच्या बाहेर पडायला घाबरत अाहेत.यात शेक-याची अतोनाथ नुकसान झालेली आहे.तेव्हा नरभक्षी वाघाला बंद करण्या करीता भारतीय जनसंसद,जिल्ह्यातील सर्वपक्षीय परीसरातील अनेक ग्राम पंचायती व जनतेच्या वतिने दिनांक01/09/2021 ते 04/09/2021 पर्यंत ठिय्या व जेलभरो आंदोलन करण्यात आले होते .तेव्हा गडचिरेलीच्या वनसंरक्षकानी नरभक्षक वाघाला लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन देवूनही ऩिष्क्रीय व निष्काळजीपणा करणा-या वनविभागातील कर्मचारी व अधिका-याना सदर वाघाला जेरबंद करण्या करीता अपयश आल्याने परत नरभक्षक वाघाने मौजा धुडेशिवनी येथील नामदेव गुडी व जेप्रा येथील भांडेकर यांना ठार मारले.आणखी नरभक्षक वाघ किती बळी घेणार असा प्रश्न परीसरातील जनतेमध्ये निर्मान झाला असुन पुन्हा एकदा शासन, प्रशासनाचे व जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधण्या करीता गडचिरोली येथील इंदीरा चौकातुन तर मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ,सर्वपक्ष, परीसरातील ग्रामपंचायती व संतप्त नागरीकानी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ढोलबजाव मोर्चा आंदोलनाची धडक दिली.यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे
*मुख्य मागण्या*
14 निष्पाप लोकांचे बळी घेणा-या व शेतक-याचे गाई,म्हशी,बकल्या फस्त करणा-या नरभक्षक वाघाला एका दिवसात ठार मारा अन्यथा वनाधीका-याना वेठीस धरणार.
उप वनसंरक्षक वनविभाग वडसा व उप वनसंरक्षक वनविभाग गडचिरोली यांचेवर मणूष्य वधाचे तात्काळ गुन्हा नोंद करा.
अकार्यक्षम वनाधीकारी व वनकर्नचा-यांची हकालपटी करा.
चुरचुरा येथील अंदाजे 40 एकर जागेत अवैद्य व्रुक्षतोड करुन वनसंपतीचे -हास करणा-या दोषी वनरक्षक,वनपाल,वनपरीक्षेञाधीकारी याचेवर तातडीने निलंबनीची कार्यवाही करुन त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करावे.
, नरभक्षक वाघाच्या दहशतीत शेती न करणा-य़ा अथवा वाघाच्या भिती पोटी अनेक शेतकरी शेतावर न गेल्याने त्यांच्या शेत पिकाची नुकसान झालेलाी आहे.अशा सर्व शेतकरी बांधवाना महसुल व वनविभागा कडून प्रत्येकी एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे.
घोटचे वनपरीक्षेञाधीकारी यांचे कारकीर्दीत झालेल्या एकुन कामाची व त्यावरील एकुन खर्चाची एकुन आर्थीक व्यवहीराची चौकशी समिती मार्फत सखेल चौकशी करुन कार्यक्षम वनपरीक्षेञाधीका-याची घोट वनपरीक्षेञात नियुक्ती करावे या व अन्य मागण्या संदर्भात .वरील संपुर्ण मागण्याची पुर्तता करण्या करीता मोर्चाचे नेत्रूत्व देवाजी तेफा जेष्ट समाजसेवक,
डाँ शिवनाथ कुंभारे राज्य समिती विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, संसदेचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश कुडवे, जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर, रमेश बांगरे,निलकंठ संदोककर व परीसरातील नागरीकाच्या वतिने करण्यात आले यात अनेक ग्रामपंचायत ,विविंध पक्षातील नेते मंडळी,व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
मागण्या मंजूर न झाल्यास वनाधिका-याना घेराव करणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगीतले












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा