बुधवार, ४ जुलै, २०१८

जागृत युवा मंचची किलबिल अनाथाश्रमला भेट

जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष *राहुलभाऊ पेंढारकर* यांनी चंद्रपूर येथील  *किलबिल* अनाथ आश्रमच्या मुलांसोबत वाढदिवस सेलिब्रेट केलां. त्याच निमित्याने अनाथ मुलांना,कपडे, स्वेटर, ब्लँकेट, दूध डब्बे provide करण्यात आले. प्रसंगी चंद्रपूर येथील जागृत युवा मंचच्या सदस्या सुजाता मॅडम, सारिका मॅडम, उज्वला मॅडम, वैशाली मॅडम आणि किनारा यांनी विशेष सहकार्य केले. त्याच बरोबर युवा विकास संस्थेचे रुपेश गावडे, व जागृत युवा मंचचे सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार, गिरिधर दलाईत, शिवानी विश्वास, रागिणी उईके आदी सदस्य उपस्थित होते. किलबिल ला भेट देऊन एक वेगळा अनुभव आला.. सर्व सदस्यांचे धन्यवाद.























बुधवार, २७ जून, २०१८

अहेरी येथे सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करा- विद्यार्थ्यांची मागणी*



अहेरी- जागृत युवा मंच व युवा विकास संस्था प्रेरित चाणक्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पंचायत अहेरी येथे स्मरणपत्र देऊन वाचनालयाची मागागी करण्यात आली. अहेरी उपविभागातील विद्यार्थ्यांनी गेल्या चार वर्षापासून वाचनालयाची मागणी रेटून धरण्यात आली होती परंतु ह्या मागणीकडे नगरपंचायतचे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व वाचन प्रेमी ह्यांनी नाराजी वर्तविली होती. स्मरण पत्रात म्हंटले आहे की, ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार कलम २४३(ड) अन्वये नगर पंचायत व नगरपरिषद ह्यांचे कार्य दिले असून त्यात १३ वे कार्य हे सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून देणे संदर्भात असल्यामुळं नगरपंचायतला कलम २४३ (ड) चा विसर पडलेला आहे. सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून देण्याकडे नगरपंचायत चे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे अहेरी उपविभागातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मरण पत्र स्वीकारत नगराध्यक्षा यांनी येत्या पंधरा दिवसात वाचनालय उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले असून मागणी पूर्ण न झाल्यास स्व पुस्तकांसह नगरपंचायत च्या परिसरात उपोषण करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
याप्रसंगी जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, युवा विकास संस्थेचे अध्यक्ष रुपेश गावडे, चाणक्य अकादमी चे जुगल बोंमंवार, दीपक सूनटकर, सुधीर कोरेत, मोहन चांदेकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

बुधवार, ६ जून, २०१८

● *जागृत युवा मंच तर्फे चेरपल्ली येथे शेतकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप*

● *जागृत युवा मंच तर्फे चेरपल्ली येथे शेतकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप*
● *जागृत युवा मंचा अहेरी च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले*.
 *अहेरी :-* पावसाळी हंगामात शेतकरी बांधव पेरणी, धानकापणी करत असतात अशा वेळेस त्यांना पावसामुळे त्रास जाणवत असतो. शेतकरी वर्गाला शेती चे कार्य करत असताना पावसाळ्यात पाऊस पडतांना शेतकऱ्यांना पाण्यामध्ये भिजतच कार्य करावे लागते अशी माहिती प्राप्त होताच शहरातील जागृत युवा मंचाने पुढाकार घेऊन रेनकोड वाटण्याचे निर्धार करून त्यांचे अमूल्य योगदान बघता चेरपल्ली गावातील एकूण २८ शेतक-यांना रेनकोट वाटप करण्यात आले. गावकऱ्यानी जागृत युवा मंचचे आभार मानले असून या प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर,रुपेश गावडे, अक्षय चांदेकर, अरुण सुनतकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार, मोहन चांदेकर यांचे विशेष योगदान लाभले.
 


रविवार, २७ मे, २०१८

*जागृत युवा मंच तर्फे कौशल विकास प्रशिक्षण संपन्न.

जागृत युवा मंच, अहेरी व सुपर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व शहरी भागातील महिला व युवती करिता ब्युटी पार्लर कौशल्य विकास प्रशिक्षणकार्यक्रम राबविण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागातील युवती व महिलांकरिता प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्य विकास साधने व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश सुपर इंस्टीटयूटचा आहे. सदर कार्यक्रम दोन महिन्या साठी राबविण्यात आला होता. प्रशिक्षण दरम्यान सामजिक उपक्रम राबवून महिला व युवतीचे  समाजाप्रती असलेली वैचारिक पातळी  तपासण्यात आली.
          कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तनूश्रीताई आत्राम , प्रमुख अतिथी म्हणून जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, रूपेश गावडे, प्रमुख पाहुणे पाश्टर आमीन व प्रशिक्षक रीन्की गुप्ता उपस्थित होत्या. विचार मंचावर अध्यक्षीय भाषणात तनूश्रीताई म्हणाल्या की , आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन उभी आहे. संसाराची जबाबदारी पुरुषांबरोबर स्त्रियांवर सुद्धा असते. त्यामुळे स्व चा विकास करण्यासाठी युवतीनी घराबाहेर पडून विविध उपक्रमात सहभागी होऊन कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकास साधावा आणि त्याबरोबरच मुलांवर सुद्धा चांगले संस्कार घडवून आणावेत. तसेच जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी भविष्यात युवकांसाठी संस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण जागृत युवा मंचच्या वतीने राबविण्यात येईल व त्याचा युवकांनी उपभोग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमात युवतीनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु मयुरी खोब्रागडे, प्रस्ताविक प्रियंका डोंगरे तर आभार यौगेश्री कत्रौजबार यांनी मानले.


शनिवार, १९ मे, २०१८

*जागृत युवा मंचच्या वतीने गरजू मुलांना bag व कपड्यांचे वितरण *चेहऱ्यावर तरंगले आनंदाचे रंग



स्वत:ची सामजिक जबाबदारी स्वीकारत समाजाचं काही देण लागतं म्हणून जागृत युवा मंच सामाजिक कार्याचा  कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थ सेवा देत असते. अहेरी येथील धरमपूर वार्डात जागृत युवा मंचच्या वतीने 80 गरजू लहान मुला-मुलींना bagकपड्यांचे वाटप करण्यात आले. मुलांच्या पालकांनी जागृत युवा मंचचे आभार व्यक्त केले असून मुलांच्या  चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. प्रसंगी जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवी गज्जल्वार, अक्षय चांदेकर, अक्षय कोवे, चंद्रपूर येथील सुजाता रामटेके मँडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
    मुलांनी फुलवीलेले आनंदाचे क्षण








गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

त्या_पीडीतेला_श्रद्धांजली


*अहेरीत आसिफा आणि शुभांगीसाठी कँडल मार्च*
*जागृत युवा मंच तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
 व आरोपींना फाशीची शिक्षाची मागणी
*अहेरी:_* देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत असून मुली असुरक्षित आहेत.जम्मू काश्मिरच्या अवघ्या आठ वर्षीय आसिफा या बालिकेवर आणि महाराष्ट्रातील वर्धा येथील शुभांगी उईके यांच्यावर अन्याय व अत्याचार झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहेरीत जागृत युवा मंच तर्फे कँडल मार्च काढण्यात आले. आणि दुर्दैवी घटनेचा निषेधही नोंदविण्यात आले.
     आसिफा आणि शुभांगी या मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि प्रकरणाचे तात्काळ निकाल लागण्यासाठी  फास्ट ट्राक कोर्टात प्रकरण चालविण्यात यावे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अजून कठोरातील कठोर कायदे तयार करण्यात यावे आदी मागण्या युवा जागृत मंचने केले असून दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध नोंदविले आहे व या पुढे माणुसकीला काळीमा फासणारे घटना जागृत युवा मंच कदापिही खपवून घेणार नाही असा इशाराही अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी  दिला आहे.
     कँडल मार्च व निषेध सभेत सचिन खोब्रागडे, मोहन चांदेकर, अक्षय चांदेकर, गिरिधर दलाई, रिंकी गुप्ता, आयुशी नैताम, मयुरी खोब्रागडे, माणशी खोब्रागडे, कोसरे, तृप्ती पिंपळकर आदी व बहुसंख्येने नागरिक सामील होते.