ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७
ह्याला जवाबदार कोण..?
आज (दि.25/9/2017) रात्रौ 10:30 वाजता मी आलापल्ली वरून अहेरीला यायला निघालो. मी दुचाकीने प्रवास करत होतो आणि त्यावेळेस माझा मित्र माझ्या सोबत होता. प्रवासात नागेपल्ली ह्या गावाच्या मध्यरस्त्यावर एका गायीचे वासरू घायाळ परिस्थितीत पडलेले आढळून आले. आम्हाला त्याची काही मदत करता येईल का ह्या उद्देशाने आम्ही बाईक थाम्बवली. त्याच्या शरिरावर गम्भीर दुखापत झाली होती.अपघात कुण्या अज्ञात चारचाकी वाहनाने झाला असावा हे त्याच्या जखमावरून सहज तर्क लावता येत होतं. हॉस्पिटलमधे नेण्याकरीता मदत लागेल म्हणून मी माझ्या मित्रांना फोन करत असतानाच त्याच्या शरिरावर झालेली जखम त्याला असाह्य झाली आणि आमच्या डोळ्यांदेखत त्याचा जीव गेला...!
ही घटना तुमच्या आमच्या साठी काही नवीन नाही; पण विचार करायला भाग पडणारी घटना आहे. घडलेल्या प्रसंगांवरून एक नजर फेरली की आपल्या सहज लक्षात येतं आणि आपोआप एक प्रश्न उभं रहातं, "ह्याला जवाबदार कोण ?" आपल्या गुरांची जवाबदारी न स्विकारता दुर्लक्ष करणारे त्यांचे मालक, की कोंडवाळा न बांधता त्यांना मोकाट फिरायला भाग पाडणारे ते स्थानिक प्रशासन..? रस्त्यावर बाजार करून बसलेली ती निष्पाप, नासमझ जनावरं की, त्यांचा जराही विचार न करता त्यांना तुडवून पुढे निघून जाणारे स्वतः आपण ? असो.! तो गेल्यावर एका गाईच्या संवेदना जाग्या झाल्या आणि ती त्याला आपल्या जीभेने चाटत होती, तो गेल्याचं तिलाही कळलं असेल कदाचित ! त्यांच्या कुटुम्बाची अवस्था बघून काही क्षणासाठी का होईना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. कारण ती गाय असली तरी एका वासराची माय होती. आम्ही त्याची मदत करू शकलो नाही ह्याच दुःख होतय. ह्याला जवाबदार कोण ? दोष कुणाला द्याव ? हे माला कळत नाही. पण आपणा सर्वाना एक विनंती करतो. वाहने हळु चालवा, आपल्या हातून कुणाचा अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्या. जगा आणि जगू दया. कुणास ठाऊक, कुणीतरी कुणाची आतुरतेने वाट बघत असेल..
-राहुल पी. पेंढारकर
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन.
.
सर्वसाधारण व विशेष घटक योजने अंतर्गत प्रथमच अहेरी येथे अनुसूचित जातीतील व सर्वसाधारण इतर जातीतील महिला व युवतींकरीता गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली मार्फत सदर कार्यक्रम घेण्यात येते. यामार्फत बेरोजगाराना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश असतो. कार्यक्रमातून शासकिय योजना व अनुदान विषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा निरीक्षक श्री बढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक पवन भांडेकर,प्रशिक्षिका रेखा सिंग, कार्यक्रम समन्वयक, जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार,राकेश रापर्तीवार,विजय गड्डमवार,गीरीधर दलाई आदि उपस्थित होते
बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
जागृत युवा मंचच्या वतीने 5 सप्तेम्बर 2017 ला निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ..!
मित्रांनो... 5 सप्तेम्बर 2017 ला जागृत युवा मंच तर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. आपण सर्व होतात म्हणूनच हे कार्यक्रम घेणे श्यक्य होऊ शकल. यात अपना सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. पुढेही आशेच सहकार्य करत रहाल अशी अपेक्षा करतो.आपना सर्व सहकारी मित्रांचे मनापासून आभार.
आज दि. 13 सप्तेम्बर 2017 ला गीताताई अलोने यांनी जागृत युवा मंच च्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 9 ज्ञानवर्धक पुस्तक दिलीत त्याबद्द्ल त्यांचे आभार.
बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७
*जागृत युवा मंच च्या वतीने शिक्षक दिन साजरा*..
*ड्रा. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवसाला दिली सावित्री ज्योतिबा फुलेंच्या इतिहासाची भेट...!जागृत युवा मंच अहेरी/आलापल्ली च्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. शिक्षक दिनाच्या नीमीत्याने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व पुस्तक दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत अ गटातून " सावित्रीबाई फुले"विषय घेण्यात आला होता. त्यामधून प्रथम पारितोषिक मनिष खोब्रागडे,द्वितीय पारितोषिक ईश्वर पोर्तेत तर त्रुतीय पारितोषिक संस्कृति हीचामी हिने पटकावला. ब गटातून "धरती आबा बिरसा मुन्डा" हा विषय घेण्यात आला होता ह्यमधून प्रथम पारितोषिक आकाश सरकार, द्वितीय पारितोषिक रमेश मडावी तर तृतीय पारितोषिक रीता इश्टाम ह्यांनी पटकावला. क गटातून "हुन्डा प्रथा एक सामाजिक समस्या" हा विषय घेण्यात आला होता ह्या गटातून सुजाता खोब्रागडे प्रथम, चंदनी गेडाम द्वितीय तर तृतीय पारितोषिक पायल चीलकम्वार हिने पटकावला. रांगोळी स्पर्धेत चेतना मूरमुरवार प्रथम,सुजाता खोब्रागडे द्वितीय तर तृतीय क्रमांक रेश्मा हीचामी हिने पटकावला. शिक्षक दिनाच्या शुभपर्वावर "मी सावित्री जोतिबा फूलेचा शिलेदार बोलतोय" हा एकपात्री प्रबोधनपर नाट्यप्रयोग अक्षय लोणारे यांनी सादर केला. श्री मूक्कावार सर ह्यांचा सहपत्नी आदर्श शिक्षक म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम क्रीडा संकुलन आलापल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी आमदार दीपकदादा आत्राम, अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कन्कडालवार तर विशेष अतिथी म्हणून उपसरपंच पुष्पाताई अलोने,विजयभाऊ खरवडे, प्रा. आनंद अलोने, लैजाताई चालूरकर, सौ दलाल मॅडम, श्री मूक्कावार सर, श्री गणपत तावाडे, सौ भगत मॅडम आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर व स्नेहल जॉब ह्यांनी केले. तर आभार आरती गेडाम यांनी मानले. सदर कार्यक्रमाकरीता सचिन खोब्रागडे , विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,गिरिधर दलई,साजन ऊइके,,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास, पूनम खांदरे,मोनिका मूरमूरवार,निशा खोब्रागडे,सोनाली भट,पायल कोडापे आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळनी सहकार्य केला
जागृत युवा मंच चे शिष्टमंडळ
रविवार, ३ सप्टेंबर, २०१७
आज दि. 3 सप्तेम्बर 2017 ला आलापल्ली येथील उपसरपंच श्रीमती पुष्पाताई अलोने ह्यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय संविधान आणि इतर ज्ञानवर्धक पुस्तके गरजूसाठी दान दिल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे त्यांचे आभार.
![]() |
| पुस्तकं स्विकारताना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ |
शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७
सौ. मेश्राम काकू कडून पुस्तक दान कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तब्बल 16 पुस्तकं प्राप्त झाल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे आभार.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


















