चंद्रपूर :
आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ चंद्रपूर या संस्थेच्या स्वनिधीतून ' मोफत कपडा बँक ' चा उद्घाटन सोहळा पार पडला.
चंद्रपूर येथे "मोफत कपडा बँक" सुरू करण्यात आली असून, दर महिन्याला गरजू लोकांना कपड्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. या अभियानासाठी निवडक ठिकाणी वितरण केंद्र उभारले जाणार असून स्वेटर, मफलर, ब्लँकेट असे ऊबदार वस्त्र सुद्धा या केंद्रांवर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन राहुल पेंढारकर यांनी दिली. या उपक्रमाला चंद्रपूर शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मागील पाच वर्षा पासून ' कपडा दान ' हे अभियान संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असून आजवर अनेक गरजू लोकांना मोफत कपडा वितरण करण्यात आले आहे. शिवाय गरजू विद्यार्थी, मूक बधिर विद्यार्थी ह्यांना ब्लँकेट, स्वेटर, शूज, सॉक्स, shool bag चे वितरण सुद्धा संस्थेच्या स्वनिधीतून करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन राहुल पेंढारकर, वैष्णवी कुलसंगे, पितांबर सूर्यवंशी, सगीर सय्यद, खुशबू सय्यद, ख्वाहिश सय्यद , मानकर, पि .बी पेंढारकर आदि उपस्थित होते.
मोफत कपडा वितरणाचे उद्देश
''आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांसाठी कपडे खरेदी करणे शक्य नसते, अशा लोकांना आधार देणे हा आमच्या संस्थेचा एक मुख्य उद्देश आहे. ही एक मानवी कर्तव्य आणि संवेदनेची अभिव्यक्ती आहे, जी गरजूंना मदत करते. थंडीच्या काळात, गरीब आणि बेघर लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी स्वेटर आणि ब्लँकेट वाटप करून, आम्ही मानवी कर्तव्य पूर्ण करीत आहोत '
- राहुल पेंढारकर, चेअरमन, (TRL MCEB)









































































