चंद्रपूर/ सर्वांगीण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर तथा जागृत युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने शंभर महिलांचा 'एकात्मिक बालविकास महिला बचतगट' स्थापन करण्यात आले. रमाबाई नगर येथील महिलांच्या सर्वांगीण विकास आणि महिला सक्षमीकरण करिता बचत गट स्थापन करण्यात आले असून त्यातून महिलाना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे हा उद्देश आहे. सोबतच येथील बालकांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाकरिता निशुल्क 'समुपदेशन केंद्र' सुरु करण्यात आले आहे. सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन मधे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. अशावेळेस उदरनिर्वाहाचा प्रश्न येथील महिलांना भेडसावत होता. बचतगटातून रोजगार ऊपलब्ध होईल या हेतूने येथील सामाजिक संस्थांनी पुढच पाऊल उचलला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षरोपन करून करण्यात आले. प्रसंगी संगीतमय कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन, कपड्यांचे वितरण आणि सायंकाळी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी माजी सैनीक दिवाकर पेन्दाम, मानवाधिकार परिषदचे नासिर शैख, सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सारिका उराडे, जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहूल पेंढारकर, टीना उराडे आदि उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मंचावरून बोलत आसताना 'बचत गटाच्या मदतीला मी सदैव तत्पर असेल, मदत लागल्यास मला कळवा मी वयक्तिकरित्या बचत गटाला मदत करेन'' अशे आश्वासन दिवाकर पेन्दाम यांनी दिले.






