बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

*जागृत युवा मंच च्या वतीने शिक्षक दिन साजरा*..

*ड्रा. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवसाला दिली सावित्री ज्योतिबा फुलेंच्या इतिहासाची भेट...!जागृत युवा मंच अहेरी/आलापल्ली च्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. शिक्षक दिनाच्या नीमीत्याने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व पुस्तक दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत अ गटातून " सावित्रीबाई फुले"विषय घेण्यात आला होता. त्यामधून प्रथम पारितोषिक मनिष खोब्रागडे,द्वितीय पारितोषिक ईश्वर पोर्तेत तर त्रुतीय पारितोषिक संस्कृति हीचामी हिने पटकावला. ब गटातून "धरती आबा बिरसा मुन्डा" हा विषय घेण्यात आला होता ह्यमधून प्रथम पारितोषिक आकाश सरकार, द्वितीय पारितोषिक रमेश मडावी तर तृतीय पारितोषिक रीता इश्टाम ह्यांनी पटकावला. क गटातून "हुन्डा प्रथा एक सामाजिक समस्या" हा विषय घेण्यात आला होता ह्या गटातून सुजाता खोब्रागडे प्रथम, चंदनी गेडाम द्वितीय तर तृतीय पारितोषिक पायल चीलकम्वार हिने पटकावला. रांगोळी स्पर्धेत चेतना मूरमुरवार प्रथम,सुजाता खोब्रागडे द्वितीय तर तृतीय क्रमांक रेश्मा हीचामी हिने पटकावला. शिक्षक दिनाच्या शुभपर्वावर "मी सावित्री जोतिबा फूलेचा शिलेदार बोलतोय" हा एकपात्री प्रबोधनपर नाट्यप्रयोग अक्षय लोणारे यांनी सादर केला. श्री मूक्कावार सर ह्यांचा सहपत्नी आदर्श शिक्षक म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम क्रीडा संकुलन आलापल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी आमदार दीपकदादा आत्राम, अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कन्कडालवार तर विशेष अतिथी म्हणून उपसरपंच पुष्पाताई अलोने,विजयभाऊ खरवडे, प्रा. आनंद अलोने, लैजाताई चालूरकर, सौ दलाल मॅडम, श्री मूक्कावार सर, श्री गणपत तावाडे, सौ भगत मॅडम आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर व स्नेहल जॉब ह्यांनी केले. तर आभार आरती गेडाम यांनी मानले. सदर कार्यक्रमाकरीता सचिन खोब्रागडे , विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,गिरिधर दलई,साजन ऊइके,,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास, पूनम खांदरे,मोनिका मूरमूरवार,निशा खोब्रागडे,सोनाली भट,पायल कोडापे आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळनी सहकार्य केला

                            
जागृत युवा मंच चे शिष्टमंडळ