कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग,नागपुर येथे भाग्यश्री फिल्म नाट्य अकादमीच्या वतीने BFNA सन्मान समारोह पार पडला. अभिनय, नृत्य, संगीत,लेखन, तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता तथा झाडीपट्टीचे उत्कृष्ट कलावंत म्हणून कवी व लेखक राहुल पेंढारकर यांचा 'विदर्भ भूषण' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
राहुल पेंढारकर हे झाडीपट्टी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, तथा कलावंत म्हणून सुपरिचित आहेत. 'भ्रूण कन्येचा टाहो' या कविता संग्रहात त्यांची कविता सामाविष्ट आहे. शिवाय विविध विषयावर अनेक वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. 'आई जन्माची शिदोरी', 'शोधू कुठे किनारा', 'यातना' अशा सामाजिक नाटकांतून त्यांनी आपल्या लेखणीची छाप झाडीपट्टीच्या रंगभूमीवर सोडली.
सन्मान सोहळा दया शंकरजी तिवारी, पू. महापौर महानगर पालिका नागपुर, आर. विमालाजी, जिल्हाधिकारी नागपुर, मोहनजी मते, विधायक दक्षिण नागपुर, बी. सी. भरतीया, जयप्रकाश गुप्ता, आश्विनजी अग्रवाल, प्रगतीताई पाटील, पूर्व नगरसेविका, म. न. पा. नागपुर, संजीवनी चवधरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी राहुल पेंढारकर यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष.
*जागृत युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य आजतागायत सुरु आहे.* -
गडचिरली- चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भागात ' गेल्या १० वर्षा पासून 'जागृत युवा मंच' स्थापन करून सामाजिक कार्य हाती घेतले आहे. कपडे दान, पुस्तक दान, बाल आनंद शिबिर, वाचनालयाची स्थापना, सायकल वाटप, शेतकऱ्याना रेनकोट वाटप, लहान मुलांना स्वेटर्सचे वाटप, शालेय विद्यार्थ्याना school bag चे वाटप, गरजूंना ब्लँकेटचे वाटप शिवाय अनेक सामाजिक कार्य त्यांनी निस्वार्थ भावनेने स्वखर्चातून केले आहेत.
*कोड* : -
झाडीपट्टी रंगभूमीवर कलावंत म्हणून काम करत असताना मला विशेष अभिमान वाटतं. मी ज्या समाजात राहतो त्याचं मला काहीतरी देणं लागतं. त्यामुळे मला जमेल त्या पद्धतीने मी समाजाला देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवट पर्यंत सामाजिक कार्य आणि झाडीपट्टी रंगभूमीची सेवा अशीच सुरू राहील.
- राहुल पेढारकर
Caption : ' विदर्भ भूषण ' पुरस्कार स्वीकारताना राहुल पेंढारकर





