*चंद्रपूर-गडचिरोली मधे 'फूड फॉर होप ' उपक्रमाला सुरुवात*
-जागृत यूवा मंचचा 30 दिवसाचा उपक्रम
लॉकडाउनच्या काळात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोक अडचणीत आहेत. त्यांना आता खरी मदतीची गरज आहे, लक्षात घेऊन गरजवंतांना अन्नधान्य वाटपाचे नियोजन 'जागृत जागृती युवा मंच' मार्फत सुरु आहे.
27 एप्रिल पासुन सलग 30 दिवस "फूड फॉर होप' या उपक्रमांतर्गत गरजू कुटुंबांना वाटप करण्यासाठी गहू, तांदूळ, डाळ, साखर, चहा, बिस्किटे, सॅनिटरी नॅपकिन, साबण, पेस्ट व तेल अशी अत्यावश्यक साहित्य स्विकारले जात आहे. सदर उपक्रम जागृत युवा मंच तथा एस. आर. एम. कोलेज ऑफ सोशल वर्क यांच्या विद्यमाने प्राचार्य डॉ. सुनील साकूरे यांच्या मार्गदर्शनात, प्रा. डॉ जयश्री कापसे यांच्या नियंत्रणाखाली, राहूल पेंढारकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात राबविण्यात येत असून या दोन्ही जिल्ह्यात जागृत युवा मंचचे कार्यकर्ते सामाजिक अंतर जोपासत जबाबदारी पार पाडत आहे.
स्टेटमेंट :-'ज्यांची नोकरी गेली, ज्यांना कोणताही आधार नाही, ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे घराबाहेर जाऊन काम करणे शक्य नाही अशा सर्वांना एक मदत मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात योगदान देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधावा,जागृत युवा मंचचे कार्य चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यामधे सुरू आहे.
-राहूल पेंढारकर, अध्यक्ष, जागृत युवक मंच
*हे घेत आहेत परिश्रम*
राहूल पेंढारकर, सुमीत रामटेके, अक्षय कामिडवार, श्रीकृष्णा शेंडे, अक्षय टेकाम, प्रणिता वावरे, प्रगती चुनारकर, अंकिता दिशट्टिवार




