*जागृत युवा मंच तर्फे कौशल विकास प्रशिक्षण संपन्न.
जागृत युवा मंच, अहेरी व सुपर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व शहरी भागातील महिला व युवती करिता ब्युटी पार्लर कौशल्य विकास प्रशिक्षणकार्यक्रम राबविण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागातील युवती व महिलांकरिता प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्य विकास साधने व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश सुपर इंस्टीटयूटचा आहे. सदर कार्यक्रम दोन महिन्या साठी राबविण्यात आला होता. प्रशिक्षण दरम्यान सामजिक उपक्रम राबवून महिला व युवतीचे समाजाप्रती असलेली वैचारिक पातळी तपासण्यात आली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तनूश्रीताई आत्राम , प्रमुख अतिथी म्हणून जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, रूपेश गावडे, प्रमुख पाहुणे पाश्टर आमीन व प्रशिक्षक रीन्की गुप्ता उपस्थित होत्या. विचार मंचावर अध्यक्षीय भाषणात तनूश्रीताई म्हणाल्या की , आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन उभी आहे. संसाराची जबाबदारी पुरुषांबरोबर स्त्रियांवर सुद्धा असते. त्यामुळे स्व चा विकास करण्यासाठी युवतीनी घराबाहेर पडून विविध उपक्रमात सहभागी होऊन कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकास साधावा आणि त्याबरोबरच मुलांवर सुद्धा चांगले संस्कार घडवून आणावेत. तसेच जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी भविष्यात युवकांसाठी संस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण जागृत युवा मंचच्या वतीने राबविण्यात येईल व त्याचा युवकांनी उपभोग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमात युवतीनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु मयुरी खोब्रागडे, प्रस्ताविक प्रियंका डोंगरे तर आभार यौगेश्री कत्रौजबार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा