*अहेरीत आसिफा आणि शुभांगीसाठी कँडल मार्च*
*जागृत युवा मंच तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
व आरोपींना फाशीची शिक्षाची मागणी
*अहेरी:_* देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत असून मुली असुरक्षित आहेत.जम्मू काश्मिरच्या अवघ्या आठ वर्षीय आसिफा या बालिकेवर आणि महाराष्ट्रातील वर्धा येथील शुभांगी उईके यांच्यावर अन्याय व अत्याचार झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहेरीत जागृत युवा मंच तर्फे कँडल मार्च काढण्यात आले. आणि दुर्दैवी घटनेचा निषेधही नोंदविण्यात आले.
आसिफा आणि शुभांगी या मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि प्रकरणाचे तात्काळ निकाल लागण्यासाठी फास्ट ट्राक कोर्टात प्रकरण चालविण्यात यावे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अजून कठोरातील कठोर कायदे तयार करण्यात यावे आदी मागण्या युवा जागृत मंचने केले असून दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध नोंदविले आहे व या पुढे माणुसकीला काळीमा फासणारे घटना जागृत युवा मंच कदापिही खपवून घेणार नाही असा इशाराही अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी दिला आहे.
कँडल मार्च व निषेध सभेत सचिन खोब्रागडे, मोहन चांदेकर, अक्षय चांदेकर, गिरिधर दलाई, रिंकी गुप्ता, आयुशी नैताम, मयुरी खोब्रागडे, माणशी खोब्रागडे, कोसरे, तृप्ती पिंपळकर आदी व बहुसंख्येने नागरिक सामील होते.













