मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

एन. सी. एस. टी. सदस्य आनंता नायक यांचे कडून राहुल पेंढारकर यांचा सत्कार ; पुस्तकांची भेट.






गडचिरोली :

 राष्ट्रिय अनुसुचित जनजाती आयोग,भारत सरकार, दिल्लीचे सदस्य अनंता नायक यांच्या हस्ते राहुल पेंढारकर यांना पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले. 

   आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या वतीने राहुल पेंढारकर हे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात सामाजिक सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसात अभ्यास दौरा सुरू असताना पेंढारकर यांची एन. सी. एस. टी. सदस्य अनंता नायक यांच्या दिल्ली येतील निवासस्थानी भेट झाली. प्रसंगी आदिवासींचे हक्क व अधिकार तथा शैक्षणिक धोरण यावर सखोल चर्चा करण्यात आली. नायक यांनी पेंढारकर यांच्या कार्याची दखल घेत, " स्वतंत्रता संग्राम मे जनजाति नायको का योगदान, एन. सी. एस. टी. माहिती पुस्तिका, Change in Faith is Change in Culture अशी पुस्तके भेट देऊन त्यांना सन्मानित केले. राहुल पेंढारकर हे झाडीपट्टी रंगभूमीचे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून काम करत आहेत. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

राहुल पेंढारकर यांचा सत्कार

 














   बिरसा क्रांती दलच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात रावण पूजेचं ओचित्य साधून राहुल पेंढारकर यांचे  'गोंडवन पेटलं आहे' या सामाजिक संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिरसा क्रांती दलाच्या वतीने राहुल पेंढारकर व संचाचा सत्कार करण्यात आला. 

         आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या वतीने राहुल पेंढारकर हे आदिवासी समाजात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जागृती करण्याकरिता प्रबोधन करत असतात. हया कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत बिरसा क्रांती दलाच्या वतीने श्रीफळ व शाल देऊन हा सत्कार करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथजी मडावी संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. उद्घाटक  डॉ. गजानन मेश्राम,माजी वैद्यकिय अधिकारी. प्रमुख अतीथी  रंगराव काळे राज्य अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. गिरजा उईके राज्य अध्यक्ष बिरसा क्रांतीदल महिला फोरम. डि. बि. अंबुरे, राज्य उपाध्यक्ष, बिरसा क्रांती दल. 

प्रभाकर गेडाम राज्य संघटक, बिरसा क्रांती दल. अशोक उईके

जिल्हाध्यक्ष / माजी नगरसेवक बिरसा क्रांती दल. विशेष अतिथी विजयसिंह मडावी अध्यक्ष, आदिवासी संघर्ष कृती समिती. किसनरावजी कोटनाके (मोकासी) अध्यक्ष, राष्ट्रीय सल्लागार गोंडवाना संरक्षण समिती. भारत आत्राम महासचिव, कृषी समिती विधानसभा.  गजानन जुमनाके अध्यक्ष, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था. प्रमोद बोरिकर अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद, अशोक तुमराम अध्यक्ष, आदिजन चेलनेचा जागर. तालुका अध्यक्ष धनाराजजी कोवे आदी हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते.


मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

*अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेचे सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन. *झाडीपट्टी कलावंतांच्या पाठीशी खंबरपणे उभे रहाणार - सुधीरभाऊ मुनगंटीवार


     राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. झाडीपट्टी रंगभूमी ही लोककलावंतांची होशी रंगभूमी आहे. येथील कलावंत हा प्रामुख्याने वैदर्भीय मातीतील शेतकरी वर्ग आहे; काळानुरूप रंगभूमीवर अनेक बदल होत गेलेत परंतु असे असले तरी येथील कलावंतांचे दिवस अजून बदललेले दिसत नाही. कलावंत पूर्वी ज्या परिस्थितीत होता तसा आजही आहे. झाडीपट्टीचा कलावंत अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहे; परंतु अद्याप येथील रंगभूमीचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमी आणि येथिल कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदनातून मागणी करण्यात आल्या.








    यामध्ये प्रामुख्याने मागण्या पुढील प्रमाणे आहे. झाडीपट्टीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वडसा येथे दोन हजार आसनसंख्या असलेले नाट्यगृह ऊभारण्यात यावे. महागाईच्या वाढत्या दराचा विचार करुन जेष्ट कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, नाट्यप्रयोगादरम्यान कलावंतांचा अपघाती अथवा अकस्मात मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची आर्थीक मदत करण्यात यावी, झाडीपट्टी नाट्यकलावंतांना शासनाच्या वतीने विमाकवच देण्यात यावे, नाटय आयोजक मंडळांचा मनोरंजन कर माफ करण्यात यावे, वडसा येथे झाडीपट्टी रंगभुमीकरीता स्वतंत्र्य रंगभुमी प्रयोग परिनीरीक्षन मंडळ स्थापन करण्यात यावे,गोंडवाना विद्यापिठात स्वतंत्र्य नाट्यशास्त्र विभाग सुरु करण्यात यावा, झाडीपट्टी नाट्य संमेलन शासनाच्या वतीने घेण्यात यावे, झाडीपट्टी कलावंतांसाठी निशुल्क नाट्य प्रशीक्षण केन्द्र सुरु करण्यात यावे, बाहेरगावावरुन आलेल्या कलावंतांसाठी वडसा येथे निवासस्थान बांधण्यात यावे, ईत्यादी प्रमुख मागण्यासह झाडीपट्टीच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

  प्रसंगी अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेचे पदाधिकारी मुकेश गेडाम, राहुल पेंढारकर, पंकेश मडावी, विक्की गायकवाड, चारुदत्त झाडे, लालु पेंदाम, संगीता भसारकर, नंदीनी दुर्गे, सारिका ऊराडे, टीना ऊराडे, नयन गेडाम आदि उपस्थित होते.

Caption - निवेदन सादर करतांना मुकेश गेडाम, राहुल पेंढारकर आणि झाडीपट्टीचे शिष्टमंडळ
Caption - निवेदन सादर करतांना मुकेश गेडाम, राहुल पेंढारकर आणि झाडीपट्टीचे शिष्टमंडळ

* मागण्याचा प्रामुख्याने पाठपुरावा करेन 

स्टेटमेंट :- 

 विदर्भात नाट्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी माझी झाडीपट्टी रंगभूमी आणि येथील कलावंतांचा मला आदर वाटतो. अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेच्या शिष्टमंडळाने दिलेले मागण्यांचे निवेदन अत्यंत महत्वाचे असून यावर मी प्रामुख्याने पाठपुरावा करेन तसेच झाडीपट्टीच्या कलावंतांच्या पाठीशी मी व शासन खंबीरपने ऊभे राहनार.

- ना. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.