शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

*जागृत युवा मंचने लग्नात दिली संविधानाची भेट

अलीकडे लग्न समारम्भात  लग्नभेट म्हणून विविध वस्तू दिल्या जातात. बदलत्या  काळाबरोबरच पैशाची उधडन करून डिजेवर पाय थीरकताना दिसतात. अशा स्वरूपात पैशाची उधळण होत असताना आपण पाहत असतो. लग्न समारम्भ मोठ्या थाटात पार पडावे म्हणून वधू कडून हुन्डा घेतला जातो. समाजात हुन्डा पद्दती पारम्पारीक स्वरूपात अजूनही रुजलेली दिसते.  परंतु आलापल्ली येथील गजानन गेडाम या युवकाने वधुकडुन कुठलिही हुन्ड्याची अट न ठेवता आंतरजातीय विवाह करून एक सामाजिक संदेश दिला आहे. त्याचेच आभार मानत जागृत युवा मंचने लग्नसमारम्भात सहभागी होऊन संविधानाचे पुस्तक भेट स्वरूपात दिली. जागृत युवा मंचने हुन्डा विरोधी पत्रके काडून समाज जागृती केली होती. अशा विवाह सोहड्यामुळे गजानन गेडाम व त्यांच्या कुटूम्बियांचे जागृत युवा मंच कडून कौतुक होत आहे. या प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जल्वार, राकेश रापर्तीवार,विजय गड्डमवार गीरीधर दलाई,रेखा डे, शीवानी बीस्वास, आरती गेडाम, रागिनी उईके आदि उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: