दि. 13 नोव्हेंबर 2017 वेळ 10:30 मी वडसा वरून नागपूर ला जायला निघालो आहे. नागभीढ स्टेशन वर मला एक लहानशी मुलगी खेळत असताना दिसली. तिचे कापड मडलेले होते. मी तिला तीच नाव विचारल पण ती गप्प होती. हे बघून तिचे वडील माझ्या जवळ आले आणि त्यानी माला सांगितल की त्या मुलीची आई हरवली आहे. त्यांना बल्लारशाला त्या मुलीच्या मामाकडे जायचं आहे पण आमच्याकडे तिकिट काढायला पैसे नाहीत, मी त्यांना तिकीट काढून दिल. मी त्यांना विचारल तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे ? तेव्हा तो सांगत होता माला माझ्या मुलीला शाळेत घालायचय पण माझी परिस्थिती वाईट आहे. मला फक्त त्यांना तिकीट काढून देता आलं ह्याचं समाधान वाटतंय, पण त्या मुलीच्या शिक्षणासाठी काहीच करू शकलो नाही ह्याच मात्र दुःख होतय. "ती" आणि तिचे वडील गावी पोहचतील पण ; तिच्या शिक्षणाच काय ?
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७
पण तिच्या शिक्षणाच काय..?
बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७
गरमेंट प्रशिक्षण सम्पन्न..
सर्वसाधारण व विशेष घटक योजने अंतर्गत प्रथमच अहेरी येथे अनुसुचित जातीतील व सर्वसाधारण इतर जातीतील युवतींसाठी गारमेंट उध्योजकता विकास कार्यक्रम राबवीन्यात आले होते. एकंदरीत ह्या कार्यक्रमाला युवतींनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली मार्फत घरबसल्या बेरोजगार व होतकरू युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. सदर कार्यक्रम अहेरी येथे सम्पन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी एम सी ई डी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री संदीप जाने,श्री गाईन ,पवन भांडेकर, तालुका समन्वयक राहुल पेंढारकर,प्रशीक्षीका रेखा कौर उपस्थित होते.
*राहुल पेंढारकर यांना राज्यस्तरीय आदर्श कर्यगौरव पुरस्कार प्रदान..*
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुनीजन गौरव परिषद सोहळा नागपूर येथे मंगळवरी दु 2 वाजता पार पडला. ऍड. कृष्णाजी जगदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामांकित मानकरी गुनीजन गौरव परिषदेत उपस्थित होते. याप्रसंगी राहुल पेंढारकर ह्यांना राज्यस्तरीय गुनीजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. लक्षवेधी गौरवपदक,विशेष महावस्त्र, खास मानपत्र, पुश्पहार व श्रीफळ अशा प्रकारे पुरस्काराचे स्वरूप होते. राहुल पेंढारकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यानी "आई जन्माची शिदोरी" , "शोधू कुठे किनारा" ह्या सामाज प्रबोधनात्म्क नाटकाचे लेखन केले आहे. "छब्बू ताईची शाळा" या गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित ऑडियो सीडी मधे गीत लेखन व गायन केले तर "भ्रूण कन्येचा टाहो" ह्या कवीता संग्रहात त्यांची कवीता समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय विविध वर्तमान लेख प्रकाशित झाले आहेत. कलेचा वारसा जपत ते सामाजिक बांधिलकी सूद्धा जोपासत आहेत. जागृत युवा मंचच्या माध्यमातून ते यूवाकाना एकत्र करून सामाजिक उपक्रम राबवत असतात. या कार्याची दखल घेता त्याना 2014 मधे कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ड्रा बाबासाहेब आम्बेडकर जनमीत्र पुरस्कारानी गौरविण्यात आले होते. हा त्याना मिडालेला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यामुडे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी रुपेश गावडे, रवी गज्जल्वर, गीरीधर दलाई , विजय गड्डमवार जागृत युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.
मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७
*जागृत युवा मंच तर्फे विद्यार्थी दिवस साजरा * अवांतर वाचनासाठी विद्यार्थ्याना दिला बाबासाहेबांच्या पुस्तकांचा खजिना
महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर हा ड्रा बाबासाहेब आम्बेडकर ह्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून जाहीर केला होता.शिक्षण हेच उन्नतीचे साधन असल्यामुळे जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने पहिलाच विध्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शैलेश कोसरे सर, प्रमुख अतिथी म्हणून भगवंतराव महाविद्यालय येथील श्री महाकालकर सर, संत मानवदयाल विद्यालय येथील श्री निकोडे सर व रेखा डे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुस्तक वाचन बरोबरच अवांतर वाचन देखील तेव्हढेच महत्वाचे आहे हे ओळखुन जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने विद्यार्थ्यांना बाबासाहेब आम्बेडकर व तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या पुस्तकांचा खजिना शुभेच्छा स्वरूपात देण्यात आला. वाचनातून परिवर्तन घडून यावे आणि भावी पिढी ही समतावादी विचारांची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.याप्रसँगी विचारमंचावर अध्यक्ष स्थानावरून बोलतांना श्री शैलेश कोसरे ह्यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हंटले की, बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व खूप महान होते विद्यार्थयानी त्यांचे अनुकरण करवायास पाहिजे. वाचनातून विचार वाढीस येतात आणि स्व चा विकास होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास करण्यासाठी वाचनालयाची निर्मिती करायला पाहिजे, अशे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, अलोने दादा, हर्षा अलोने, स्नेहल जॉब, शीवानी बीस्वास, रागिनी ऊइके यांनी सहकार्य केला. संचालन सौ. गीता अलोने, प्रास्तवीक चेतना चालूरकर तर आभार राहुल पेंढारकर यांनी मानले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)








