बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

*झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश जाहीर करा* -राहुल पेंढारकर, संतोष बारसागडे यांची मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी










अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कोरोना संदर्भात सर्व शासकीय नियम पाळून नाट्य प्रयोग सादर करण्याचे आश्वासनावर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर रोजी उघडण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यानी  शासकीय अधिकारी आणि विभागांना दिले आहेत. परंतु विदर्भाच्या पूर्वेस असलेली झाडीपट्टी रंगभूमी ही स्वतंत्र आणि समृद्ध असून खुले रंगमंच असलेली रंगभूमी आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाची परवानगी मिळविताना संबंधित अधिकाऱ्याकडून नाट्यकलावंताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

            झाडीपट्टी रंगभूमीचे  मुख्यालय गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे आहे. येथे 55 पेक्षाही अधिक नाटकाचे गृप आहेत. निर्माता, कलावंत, लेखक, दिग्दर्शक, नैपथ्यकार, वाहन चालक, पेंडाल वाले, पार्श्वसूचक यांचे पोट झाडीपट्टीच्या नाटकानांवर चालते. कोरोना काळात अनेकदा पोलिस स्टेशन मधून नाट्य प्रयोगाकारिता परवानगी नाकारण्यात येते, तर कधी चक्क पोलिस विभागातर्फे परवानगी मिळाल्या नंतरही नाटक सुरु असतांनाच नाटक बंद करण्याचे आदेश दिल्या जाते. अशा वेळेस नाट्यनिर्मात्यांवर नाटकाचा भुर्दंड बसतो आणि कलावंताना निराश होऊन परतावे लागते. 

            झाडीपट्टी रंगभूमी ही येथील कलावंताची आई आहे. रंगभुमीच्या भरौशावर येथील कलावंत जगतो. करिता समस्या लक्षात घेवुन ५ नोव्हेंबर पासून नाट्य गृह सुरु करण्यासाठी देण्यात येणा-या अध्यादेशात माननीय मुख्यमंत्र्यानी ‘झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश’ जाहीर करावेत अशी रास्त मागणी युवा रंगकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ता प्रा. राहुल पेंढारकर आणि प्रा. संतोष बारसागडे यांनी ई-मेल द्वारे निवेदनातून केली आहे. 

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

गोंडवाना प्रशासकीय सेवा महाविद्यालय आलापल्ली येथे शिक्षकदिन साजरा

 





5 सप्टेंबर 2021:

कृषी ग्रामीण विकास बहूद्देशिय संस्था नागपूर द्वारा संचालित गोंडवाना प्रशासकीय सेवा महाविद्यालय आलापल्ली येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्ण व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यवाहक कैलास वरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षक दिना निमित्त विद्यार्थी परिचय मेळावा, वृक्षारोपन, शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्याना उदबोधन करतांना प्राचार्य गुंडावार बोलल्या की, विद्यार्थी हा सदैव शोधक असायला पाहिजे. कोविड-19 मुळे शाळा महाविदयाल जरी बंद असले तरी अभ्यास नियमित करणे गरजेचे आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमाचा विसर पडणार नाही आणि परिक्षा सुरळीत व सोप्या पद्धतीने पार पडेल.

कार्यकर्माचे संचालन बी.ए.सी.एस. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी रोजा राऊत हिने केले तर आभार प्रा. अश्विनी पेदापल्लीवार यांनी मानले.

प्रसंगी प्रा. सुनील रामटेके, प्रा. राहुल पेंढारकर, अनिल इजगमकार, सुधाकर भोयर, तुषार पुलगमकार आदि उपस्तीत होते 

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

*अखेर नरभक्षक वाघाच्या बंदोबस्ता करीता मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकला मोर्चा*















-नागरीकामध्ये तिव्र आक्रोश वनाधिका-याचे धाबे दणाणलले

-आंदोलनातील ढोल बजाव गडचिरोली कराना ठरला आकर्षणाचा व चर्चेचा विषय


भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन,सर्वपक्षीय,ग्रामपंतायती,व परीसरातील जनतेच्या वतिने 

गडचिरोली जिल्ह्यात माणसावर हल्ला करीत प्रंचड धुमाकुळ माजविणा-या नरभक्षक वाघाने वनविभाग वडसा आणि  गडचिरोलीच्या वनव्याप्त  कार्यक्षेञात व शेतकरी बांधवाच्या शेतालगत  जवळपास 14 निप्षाप माणसाचे बळी घेतले.अनेक व्यक्तीना वाघाने  हल्ला करुन जखमी केले.एवढेच नव्हे तर अनेक शेतकरी कुटू्बातील गाई,म्हशी,बक-या फस्त केल्या ज्या मुळे परीसरातील जनता नरभक्षक वाघाच्या दहशतीत पुर्णपणे भयभित झाली असुनअनेक शेतकरी बांधव आपल्या शेतावर जाणे बंद केले.व परीसरातील नागरीक घराच्या बाहेर पडायला घाबरत अाहेत.यात शेक-याची अतोनाथ नुकसान झालेली आहे.तेव्हा  नरभक्षी वाघाला बंद करण्या करीता भारतीय जनसंसद,जिल्ह्यातील सर्वपक्षीय परीसरातील अनेक ग्राम पंचायती व जनतेच्या वतिने दिनांक01/09/2021  ते 04/09/2021 पर्यंत ठिय्या व जेलभरो आंदोलन करण्यात आले होते .तेव्हा गडचिरेलीच्या वनसंरक्षकानी नरभक्षक वाघाला लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन देवूनही ऩिष्क्रीय व निष्काळजीपणा करणा-या वनविभागातील कर्मचारी व अधिका-याना सदर  वाघाला जेरबंद करण्या करीता अपयश  आल्याने परत नरभक्षक वाघाने  मौजा धुडेशिवनी येथील नामदेव  गुडी व जेप्रा येथील भांडेकर यांना ठार मारले.आणखी नरभक्षक वाघ किती बळी घेणार असा प्रश्न परीसरातील जनतेमध्ये निर्मान झाला असुन पुन्हा एकदा शासन, प्रशासनाचे व जिल्ह्यातील  जनतेचे लक्ष वेधण्या करीता गडचिरोली येथील इंदीरा चौकातुन तर मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ,सर्वपक्ष, परीसरातील ग्रामपंचायती व संतप्त नागरीकानी  मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ढोलबजाव  मोर्चा आंदोलनाची धडक दिली.यात  सर्वसामान्य जनतेच्या हिताचे


*मुख्य मागण्या*

 14 निष्पाप  लोकांचे बळी घेणा-या व शेतक-याचे गाई,म्हशी,बकल्या फस्त करणा-या  नरभक्षक वाघाला एका दिवसात ठार मारा अन्यथा वनाधीका-याना वेठीस धरणार. 

उप वनसंरक्षक वनविभाग वडसा व उप वनसंरक्षक वनविभाग  गडचिरोली यांचेवर मणूष्य वधाचे  तात्काळ गुन्हा नोंद करा.

अकार्यक्षम वनाधीकारी व वनकर्नचा-यांची हकालपटी करा.

चुरचुरा येथील अंदाजे 40 एकर जागेत अवैद्य व्रुक्षतोड करुन वनसंपतीचे -हास करणा-या  दोषी वनरक्षक,वनपाल,वनपरीक्षेञाधीकारी याचेवर तातडीने निलंबनीची कार्यवाही करुन त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करावे.

, नरभक्षक वाघाच्या दहशतीत शेती न करणा-य़ा  अथवा वाघाच्या भिती पोटी अनेक शेतकरी शेतावर न गेल्याने त्यांच्या शेत पिकाची नुकसान झालेलाी आहे.अशा सर्व शेतकरी बांधवाना महसुल व वनविभागा कडून  प्रत्येकी एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे.

घोटचे  वनपरीक्षेञाधीकारी यांचे  कारकीर्दीत झालेल्या एकुन कामाची व त्यावरील एकुन खर्चाची एकुन आर्थीक व्यवहीराची  चौकशी समिती मार्फत सखेल चौकशी करुन कार्यक्षम वनपरीक्षेञाधीका-याची घोट वनपरीक्षेञात नियुक्ती करावे या व अन्य मागण्या संदर्भात  .वरील संपुर्ण मागण्याची पुर्तता करण्या करीता मोर्चाचे नेत्रूत्व देवाजी तेफा जेष्ट समाजसेवक,

डाँ शिवनाथ कुंभारे राज्य समिती विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष  विजय खरवडे, संसदेचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश कुडवे, जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर, रमेश बांगरे,निलकंठ संदोककर व परीसरातील नागरीकाच्या वतिने करण्यात आले यात अनेक ग्रामपंचायत ,विविंध पक्षातील नेते मंडळी,व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

           मागण्या मंजूर न झाल्यास वनाधिका-याना घेराव करणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगीतले




                          

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

चंद्रपूर येथे विविध उपक्रम


 *सर्वांगीण शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे विविध उपक्रम*


चंद्रपूर : सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. भदंत चंद्रमणी लॉन चंद्रपूर येथे सामाजिक कार्यकर्ता सारिका उराडे यांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधन साहित्य कला मंचच्या वतीने प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी राजेंद्र गोडबोले सुरेश वेस्कडे, संतोष बारसागडे, किशोर तेलतुंबडे, जयशंकर वानखेडे, सोनू उज्जेंवार, राकेश निमसरकार, यशवंत उराडे, कमलताई धुरंदर, विद्यानंद शेंडे, अविनाश चहांदे, शुभम शेंडे, देविदास कातकर 

व परिवर्तन साहित्य कला फाउंडेशन चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


*गरिबी निर्मुलन समितीची कार्यकारणी गठित* 

        वृक्षारोपन करून, व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. लालासाहेब गायकवाड आणि सल्लागार मा. ऍड. येवते पाटील एस. ए. सिनिअर ॲडव्होकेट सुप्रीम कोर्ट नई दिल्ली. माननीय लालासाहेब ह्यांच्या विशेष मार्गदर्शनातून गरिबी निर्मूलन समितीची धुरा हातात घेऊन या समितीचे काम संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी सेवाभावी समाजसेवकांची नियुक्ती करण्यात आली. संतोष जीवनदास बारसागडे यांची विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात असून गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी राहुल पेंढारकर यांची निवड करण्यात आली.


प्रसंगी विद्यानंद शेंडे यांनी समाजसेविका सारिका उराडे यांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकताना बोलले की, ताई पंचेवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात, कला क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

"दुखितांची वाट तू  

अबोलांचे ओठ तू 

तुझा गुलमोहर सखे

असाच बहरवा

तुझ्या ध्येय वेड्या कार्याला 

वसा सवित्रीचा द्यावा"

अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. पुज्य भंते धम्माघोष मेत्ता यांनी बुद्धमांगल गाथेनी कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिना उराडे तसेच आभार प्रदर्शन पापिता जूनघरे यांनी केले.







गरिबी निर्मूलन समिती च्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती