शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

डेबू सावली वृद्धाश्रमात स्नेह भोजन तथा आनंद सोहळा साजरा -दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमाची मेजवानी







दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण मानला जातो. औचित्य साधून आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, या संस्थेच्या वतीने डेबू सावली, वृद्धाश्रमात दिवाळी स्नेहभोजन, संगितम कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, वृक्षा रोपण, भेटवस्तू तथा पटाके वितरण करून, आनंद सोहळा साजरा करण्यात आला. आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवीत असते. यावर्षी सुद्धा संस्थेच्या वतीने स्नेहभोजन तथा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.  प्रसंगी पद्मश्री डॉ परशुरामजी खुणे तथा गायक कलावंत देवदत्त सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पद्मश्री डॉ परशुराम खुणे, ऍड. प्रिया पाटील तथा अध्यक्ष म्हणून डॉ किशोर पेंढारकर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी ऍड. प्रिया पाटील यांनी वृद्धांच्या कायदे विषयक मार्गदर्शन केले तर वृद्धांच्या मानसिक तथा शारीरिक आरोग्याविषयी डॉ. किशोर पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षारोपण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष, राहूल पेंढारकर यांनी केले. संचालन टीना उराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गायत्री उरकूडे यांनी केले.का







र्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. राजेश सुर, आनंद पेंढारकर, स्वाती आलाम, विलास सिडाम, प्रिती कुलसंगे, कैलाश ढेंगळे , मोहन चांदेकर , उज्वला सिडाम, हिरज मेश्राम, कृष्णाजी हातझाडे, वीरेंद्र धोटे, कविता देशमुख, प्रतीकजी तावडे, नेहल धाबेकरजी, दिपा भालाधरे,  प्रकाश सुतार, परिमल रामटेके,निरंजन बुरांडे, गोपाल क्षीरसागर , त्रिरत्न पथारे, चेतन करकाडे, नितीन कथलकर, गौतम शहारे, श्रीकांत राजगडकर, अविनाश सडमेक आदींनी सहकार्य केला.