आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी जागृत युवा मंच पुस्तक दान उपक्रम राबवीत आहे. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही तुमच्या हातांनी जागृत युवा मंचला सूपूर्त करता येईल. ती पुस्तकं युवा मंच उपयोगात आणनार असून. तुमचच पुस्तक तूम्हच्या हातांनी गरजूना सप्रेम भेट देनार आहे. त्यामुळे गरजूंना गैर वाटणार नाही हे नक्कीच आणि त्याच गरजू मुलांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान ठराल. उपक्रम सुरु करतांना जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर ह्यानी म्हंटले आहे की ,'आपला समाज हा दोन गटात विभागतो एक "आहे रे" आणि दुसरं "नाही रे" ह्यात आहे कडच्या लोकांकडे द्यायला बरंच देण्यासारख असतं पण मध्यम सापडत नाही. आज जागृत युवा मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येत आहोत. आपण दिलेल्या पूस्तकाना योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचवीन्याची जवाबदारी आमची. ह्यात कुठलही गैरप्रकार होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो. नक्की विचार करा आणि आमच्या बांधवांसाठी एक हात मदतीचा दया.'जागृत युवा मंचच्या वतीने आलापल्ली येथे पुस्तक दान उपक्रम राबविण्यात आला प्रसंगी मा. रामू मादेशी,शाम मादेशी आणि डॉ सलूजा यांनी 15 ज्ञानवार्धक पुस्तके भेट देऊन गरजूंना मदत करण्यास सहयोग केला आहे.प्रसंगी जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर, रवि गज्जल्वार,मोहन चांदेकर, निशा खोब्रागडे, हर्षा अलोने, सुनीता दुर्गे, मोना गेडाम आदी उपस्थित होते.
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
गुरुवार, १६ मे, २०१९
*जागृत युवा मंच तर्फे पुस्तक दान उपक्रमास सुरुवात*
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
