![]() |
हिवाळा ऋतू मुळे सर्विकडे थंडी जोर धरू लागली आहे. थंडीमुळे उन्हात सुद्धा गारठा जाणवायला लागला आहे. काही दिवसापूर्वी जागृत युवा मंचने एकलव्य निवासी मुकबधीर विद्यालय, आलापल्ली येथे भेट देऊन विचारपूस केली होती. तेथील विद्यार्यांना स्वेटर आहे पण रात्री पांघरूण घायला ब्लँकेट अपुरे असल्याचे कडले. एकलव्य मुकबधीर विद्यालय आलापल्ली येथे एकूण 40 विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता आणि थंडीपासून मुकबधीर भावंडांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांना "आईची ब्लँकेट" चे वितरण करण्यात आले. आनंद द्विगुणित व्हावा म्हणून त्यांना चॉकलेट खाऊ म्हणून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी साईन लेंग्वेज मधे जागृत युवा मंचचे स्वागत केले. मा. मुख्याध्यापक चौधरी सर यांनी जागृत युवा मंचचे आभार मानले. हे एक वेगळे आकर्षण होते आणि एक सुखद अनुभव होता. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकजी आईंचवार, एकलव्य मुकबधीर विद्यालय येथील मुख्याध्यापक श्री चौधरी सर, जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार,विजय गड्डमवार,गीरीधर दलाई,मंगेश ऊइके,अक्षय चांदेकर, आकाश पेंदोर, मनोज गेडाम,निशा खोब्रागडे,प्रिया मडावी,पिंकि ऊइके, कल्याणी ऊइके,निता आलाम,कल्पना पेंदोर, रेखा डे, आरती गेडाम, स्नेहल जॉब, ज्योती मडावी,एकलव्य मूक बधिर विद्यालय आलापल्ली येथील सर्व शिक्षक वृंद आणि जागृत युवा मंच चे सर्व पदाधीकारी ह्यांच्याकडून सहकार्य लाभले.


























































