गडचिरोली
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी भामरागड केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. भामरागड केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण, स्वयं रोजगार या विषयावर प्रबोधन करण्यात आले.
आदिवासी संस्कृती प्रमाणे लग्नसोहळा जाणून घेताना
वनभोजन आणि इतर गमतीजमती
हेमकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट
आदिवासी संस्कृतीचे माडीया नृत्य
आदिवासी संस्कृती प्रमाणे लग्नसोहळा जाणून घेताना
कलापथकाचे सादरीकरण भामरागड केंद्रातील लाहेरी, मलमपोदुर, धोडराज, मेडपल्ली, हिनभट्टी, हिंदेवाडा, भामरागड, हेमलकसा, कुमरगुडा, ताडगाव, धुळेपली, आरेवाडा, राणीपोद्दुर, कुडकेली, मनेराजाराम, कियर, कारमपल्ली, हलवेर, नारगुंडा, कोठी या गावात करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजन नमन गोयल भा. प्र. से प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, रोशना चव्हाण सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, राहूल कोहाडे कार्यालीन अध्यक्ष, मनोज सयाम, ए. एम. पूगाटी, निरीक्षक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कलापथकाचे सादरीकरण राहुल पेंढारकर, पितांबर सूर्यवंशी, गणेश कोळणकर, टिना उराडे, साक्षी धनरे, आशिष, सचिन यांनी केले. कलापथकाच्या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटिल,नगर सेवक,सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामवासी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 










































