शनिवार, २० मे, २०१७

*हुन्डा बळी झालेल्या एका निष्पाप मुलीचं आपल्या बाबाला पत्र...*




तीर्साथरुप बाबास, सा. नमस्कार...
    बाबा,मला खूप आठवण येतेय तुमची. कशे आहात तुम्ही? वीसरलात काय मला माझी आठवण येते का कधी ? बाबा अजुनही चांगल आठवतं. मी लहान असताना तुम्ही ऑफिस मधे जायचात, तेंव्हा मी तुमची सतत वाट बघत असायचे. केव्हा माझे बाबा घरी येतील आणि माझ्या सोबत खेळतील. तुम्ही यायचात माझ्यासाठी खाउ घेउण आणि मी तुम्हाला आनंदाने मिठी मारायचे. त्या मिठीत माझ अक्ख जग सामावलं असायचं. बाबा , आठवतं का तुम्हाला,तूम्हच्याच बोटाचा आधार धरून चालायला शिकले होते मी. धडपळून पडायचे तेव्हा माझ्या पेक्षा जास्त तुम्हाला त्रास व्हायचा. तुम्ही मला मुलगी नाही तर मुलगा समजायचात. तूम्हच्याच पाउलावर पाउल ठेवून मोठे झाले मी. लग्नाच्या उम्बरठ्यावर उभी होते. स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असतानाही तुमच्या शब्दापलीकडे जाण्याचा कधी प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण तुमचे संस्कार होते माझ्यावर.
          बाबा,लग्न मंडपात हुन्ड्याच्या दावणीला बांधून तुम्ही माझ्यापासून स्वतःची सुटका करून घेतलात हे खरे,पण मला मात्र आयुष्यभर मरणाच्या कड़ा सोसाव्या लागल्यात. लग्नानंतर हुन्ड्यासाठी सासरकडून रोज-रोज होणारा शारीरिक व मानसिक अत्याचार मला सहन होत नव्हता. तेव्हा वाटायचं, धावत येऊन मनातलं सारं तुमच्यापाशी मांडाव. पण विचार यायचा, "माझ्या बाबांनी तडजोड करून केलेलं माझ लग्न, हे लग्न मोडण्याचा मला काहीयेक अधिकार नाही." म्हणून मुकाट्याने अन्याय सहन करत गेले. नुसतं माझा चेहरा बघून वेदना ओडखणार्या माझ्या बाबाला माझ्या मनातील व्यथा कशी कडू शकली नाही ह्यातच मला दुःख वाटतेय.
         बाबा, मी आत्महत्या केली नाही हो... हुन्ड्याच्या हव्यासापोटी बळजबरीने मारलं मला. मी केविलवान्यापणे गयावया करत होते, पण माझी दया आली नाही त्यांना. बाबा मी मुलगी आहे म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही का ? ह्या जन्मी मला जे मिळालं नाही ते मला पुढच्या जन्मी हवं आहे. मला परत तूम्हच्या मिठीत यायच आहे,तुमच्या सोबत खेळायचं आहे, तेच बोट धरून इवल्याशा पायानी चालायला शिकायचं आहे. पण बाबा एक कराल का हो माझ्यासाठी ? जे तुम्ही या जन्मी केलात ते पुढच्या जन्मी करू नका. हुन्डा देऊ नका आणि हुन्डा घेऊ नका. हुन्डा प्रथेचा विरोध करा. पुढच्या जन्मी तुम्हीच मला बाबा म्हणून हवे आहात.मी परत जन्म घेईन तुमची मुलगी बनून,पण हुन्डाबळीने पिडलेल्या ह्या कलियूगात नाही, तर शोषणमुक्त व समानता युक्त त्या परिवर्तन युगात...
   

                               तुमची लाडकी छकुली

***********************************************************************
आज देशात दर एक तासाला हुन्डाबळी होत आहे. हुन्ड्यापायी छळ होऊन कित्येक युवतींना वैवाहिक जीवनातुन बाहेर पडावे लागत आहे. हुन्डा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुन्डा घेणे अथवा देणे कायद्याने गुन्हा संतांना देखील आज शिवराय,आम्बेड्करांच्या देशात हुन्डा ही प्रथा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजात कायम आहे. आज हुन्ड्याप्रती प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण मानसिक बदल घडवून आणल्या शिवाय सामाजिक परिवर्तन घडून येणार नाही. आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात. तरुणांनो विचार करा. हुन्डा प्रथेचा विरोध करा. हे पत्र वाचून कुणा एकानेही हुन्डाप्रथेचा विरोध केला तर आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजू,धन्यवाद...!

                                       *सौजन्य*
                              जागृत युवा मंच,अहेरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: