गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

रमाबाई नगर येथे 'बचत गट' स्थापन : सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ आणि जागृत युवा मंचचा पुढाकार.



चंद्रपूर/ सर्वांगीण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर तथा जागृत युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने शंभर महिलांचा 'एकात्मिक बालविकास महिला बचतगट'  स्थापन करण्यात आले. रमाबाई नगर येथील महिलांच्या सर्वांगीण विकास आणि महिला सक्षमीकरण करिता बचत गट स्थापन करण्यात आले असून त्यातून महिलाना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे हा उद्देश आहे. सोबतच येथील बालकांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाकरिता निशुल्क 'समुपदेशन केंद्र' सुरु करण्यात आले आहे. सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन मधे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. अशावेळेस उदरनिर्वाहाचा प्रश्न येथील महिलांना भेडसावत होता. बचतगटातून रोजगार ऊपलब्ध होईल या हेतूने येथील सामाजिक संस्थांनी पुढच पाऊल उचलला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षरोपन करून करण्यात आले. प्रसंगी संगीतमय कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन, कपड्यांचे वितरण आणि सायंकाळी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी माजी सैनीक दिवाकर पेन्दाम, मानवाधिकार परिषदचे नासिर शैख, सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सारिका उराडे, जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहूल पेंढारकर, टीना उराडे आदि उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मंचावरून बोलत आसताना 'बचत गटाच्या मदतीला मी सदैव तत्पर असेल, मदत लागल्यास मला कळवा मी वयक्तिकरित्या बचत गटाला मदत करेन'' अशे आश्वासन दिवाकर पेन्दाम यांनी दिले.






मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

झाडीपट्टी कलावंतांना मानधन द्या अन्यथा नाट्यप्रयोगास परवानगी दया


देशोन्नती वृत्तपत्र 



तरुण भारत वृत्तपत्र 

रावण एक्सप्रेस न्यूज़ 

चंद्रपूर समाचार वृत्तपत्र 

 

शैक्षणिक साहित्याचे वितरण

भगवंतराव हायस्कूल चेरपल्ली येथील 30 विद्यार्थ्याना निशुल्क शैक्षणिक साहित्याचे वाटप जागृत युवा मंच तथा सर्वांगीण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.








सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

निशुल्क ' बाल आनंद शिबिरा' चा पाचवा दिवस

दिनांक 29/08/2020 

आज शिबिराचा शेवटचा दिवस म्हणून मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. यातून मूलभूत, काही साध्या गोष्टी शिकवित्या आल्या. स्वावलंबन - स्वयंपाक करणे, भांडी धुणे, स्वतःचं काम स्वतः करणे.

ह्याचे चार उद्देश आहेत -


१) गरीबी - दररोज इतकी भांडी सलग 30 दिवस धुतल्यावर एखाद्याला 700 -800 रुपये महिन्याला मिळतात हे समजावे. जेणेकरून पैसे खर्च करताना आपण किती काळजी घ्यायला हवी याची जाणीव व्हावी.


२) भांडी धुतल्यावर उठताना कंबर आणि पाठ कशी भरून येते याचा अनुभव घेतल्यावर घरातील महिलांच्या कष्टांची किंमत कळावी.

३) कुठलेही काम कमीपणाचे नाही हे समजावे.

४) अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दंभ, अहंकार न व्हावा.

मुलांना परत काही किरकोळ पण महत्वाच्या गोष्टी शिकवता आल्या-भाजी, टमाटे कापण्यापूर्वी नीट धुवून घ्यावी. जेवतांना हात आणि ताट धुवून घ्यावी. 

टायर गेम- हा खेळ आहे. ह्यात स्पर्धा असते. स्पर्धेत दोन गट सहभागी असतात. म्हणून जिंकण्याकरिता एकमेकांचे सहकार्य महत्वाचे असते. शेवटचा दिवस असल्याने मुलांनी खूप एंजॉय केलं. येवढ्या दिवसात कुणी कुणाचं नकळत मन दुखावलं असेलच त्यामुळे 'सॉरी, थँक्स आणि परत भेटुया' असं म्हणता आलं.