बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

*अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित*





















झाडीपट्टी कलावंतांच्या समस्या लक्षात घेता वडसा येथे अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. झाडीपट्टी रंगभुमीला लगभग दीडशे वर्षाचा सुवर्ण इतिहास आहे. विदर्भाची झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे भविष्यातील सिनेमा सृष्टी म्हणायला हरकत नाही. परंतु कोरोना काळापासून कलावंताच्या अनेक समस्या पुढे येत आहेत त्यामुळे कलावंताच्या समस्या निकाली काढण्याकरिता,शासन दरबारी कलावंताची नोंद व्हावी याकरिता, शासकीय योजनाचा लाभ झाडीपट्टीतील कलावंताना मिळावा हे उद्दीष्ट्ये व ध्येय समोर ठेवून वडसा येथील श्रीराम मंदीरात अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. परिषदच्या अध्यक्ष पदी  प्रा शेखर पटले यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी मुकेश गेडाम,उपाध्यक्ष पदी किरपाल सयाम गडचिरोली, प्रियंका गायधने गोंदिया,किशोर भाग्यवंत भंडारा,देवा कावडे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली,सहसचिव पदी दुधराम कामडी भंडारा, ज्ञानेश्वरी कापगते गोंदिया,वासूकुमार गडचिरोली, सुनिल कुकुडकर चंद्रपूर, तर कोषाध्यक्ष पदी शंतनू कुडमेथे,प्रसिद्धी प्रमुख पदी राहुल पेंढारकर, होमदेव कोसमशिले मंगल मशाखेत्री ह्यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागार म्हणुन डॉ परशुराम खुने, नरेश गडेकर, राजा चिटणीस, देवेंद्र डोडके, अंबादास कांबळी, प्रा. डॉ. दिनकर कांबळी, डॉ प्रवीण शहारे यांची निवड करण्यात आली.  सदस्य म्हणुन विनोद काळे, प्रतिभा साखरे, उत्तम ऊके, शंभूदेवा मुर्कुटे, शेरू खान, पी लालचंद यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राहुल पेंढारकर यांनी केले, प्रास्ताविक देवा कावडे यांनी केले तर आभार डॉ दिनकर कांबळी यांनी मानले या प्रसंगी ज्येष्ट कलावंत म्हणुन सारनाथ रामटेके, भारत रंगारी, विशाल बावणे, संतोष बारसागडे,दिवाकर बारसागडे, अमरकुमार मसराम, संजीव रामटेके,विश्वास पुडके, संदेश आनंदे, घनश्याम उपरीकर आदि झाडीपट्टीचे कलावंत उपस्थिती होते.



#झाडीपट्टी_नाटकाचे_स्वतंत्र_अध्यादेश_जाहीर_करा- अ.भा. झाडीपट्टी कलावंत संघटनेची मागणी 

-यंदा झाडीपट्टी कालावतांची दिवाळी अंधारात ? 


लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद होती. तो शिथिल झाल्यावर देखील त्याकडे सरकारने कानाडोळा केला. अनेकांनी ती उघडण्यासाठी नाना प्रयोग करून पाहिले. त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन झाली.त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर रोजी उघडण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यानी शासकीय अधिकारी आणि विभागांना दिले आहेत. परंतु झाडीपट्टी रंगभूमी हे खूल्ले रंगमंच असून नाट्यगृहाच्या चौकटीत बसत नसल्यामुळे झाडीपट्टीच्या नाट्यसादरीकरणासाठी प्रशासकीय अधिकऱ्याकडून अडथळा निर्माण होत असते. त्यामुळे झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र आध्यादेश चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर येथील संबंधित अधिकाऱ्याकडे जाहीर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. झाडीपट्टीची नाटकं सिझिनेबल असतात, दिवाळी पासुन झाडीपट्टी नाटकाचा हंगाम सुरु होतो परंतु 'झाडीपट्टी नाटकाचे स्वतंत्र अध्यादेश' जाहीर न केल्यास यंदा कलावंतांची दिवाळी अंधारातच जाईल काय ? अशी शंका कलावंतांनी व्यक्त केली आहे.