शनिवार, २० मे, २०१७

हुंडा बळी चा निषेध करणारी पत्रक


*♦सत्यपाल महाराज ह्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून महाराष्ट्रातील कीर्तनकार व प्रबोधनकार ह्यांना संरक्षण द्या- जागृत युवा मंच ♦*





राष्ट्रीय किर्तनकार व प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे श्री सत्यपाल महाराज(सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर) यांच्यावर मुम्बई दादर येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी प्रबोधन करीत असताना चाकूने प्राणघातक हल्ला झाला. जखमी सत्यपाल महाराज यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यपाल महाराज ह्यांच्यावर हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा युवक 28 वर्षाचा असून मुम्बई येथील रहिवाशी आहे. त्याने मध्याधुंद अवस्थेत फोटो काढण्याचा ढोंग करून सत्यापाल महाराज ह्यांच्या पोटावर चाकूने वार केला होता. महाराज यानी सामाजिक प्रबोधन करीत असतांना कुणाल किशोर जाधव याने महाराजांवर हल्ला का करावा ? ह्यामागील उदेश्य काय ? ह्या सर्वघटीत प्रकरणामागिल मुख्य सूत्रधार कोण ? ह्याची कस्सून चौकशी करण्यात यावी शिवाय महाराष्ट्रातील प्रबोधनकार व कीर्तनकार ह्यांच्या पाउलापाऊली संरक्षणाची जाबाबदारी पोलिस प्रशासनाकडे देण्यात यावी. ह्याकरीता जागृत युवा मंच, अहेरीच्या वतीने आतीरीक्त जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना निवेदन देण्यात आले व प्रतिलिपि मा. महामहिम राज्यपाल ह्यांना पाठविण्यात आली.निवेदनात म्हंटले आहे की,"सत्यापाल महाराज हे बुद्ध,शिवाजी,बिरसा, तुकडोजी,शाहू, फुले, आम्बेड्कर यांची विचारधारा घेऊन देशभर प्रबोधन करून जनजग्रुती करीत असतात. सत्यपाल महाराज यांचे कीर्तन हे विषमतावाद, अंधश्रद्धा ह्यांवर घाव घालणारे आहे. सत्यपाल महाराज ह्यांच्यावरील हल्ला हा  पानसरे,दाभोडकर,कलबुर्गी ह्यांच्या प्रमाणेच कट रचून करण्याचा भयाण प्रयत्न होता हे दिसून येत आहे, त्यामुळे तात्काळ घटनेचा प्रकार उघडकीस आणून आरोपीस योग्य ती शिक्षा करावी. निवेदन देतांना जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर,सचिन खोब्रागडे,रवि गज्जल्वार,विजय गड्डम्वार,सुमित सिडाम, राजू येंगंटीवार, कु. प्रियंका मीटपल्लीवार,कु विजया खोब्रागडे,कु सुजाता खोब्रागडे आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदार सौ. नेरलवार मॅडम यानी स्वीकारले.
 






*जागृत युवा मंचचा कृती कार्यक्रम*



स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे असे म्हणतात, पण स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर देखील आज खरच स्त्री ही स्वतंत्र आहे का, आजही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतच आहेत. स्त्रीभ्रूणहत्येबरोबरच हुंडा ही प्रथा सुद्धा समाजाततील एक कीड आहे. सरकारने हुंडाप्रथेविरोधात कायदा अंमलात आणला पण अजूनही समाजात हुंडा ही प्रथा,परम्परा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कायम आहे. आज देशात दर एक तासाला हुंडाबळी होते. हूंडाबळीची ज्वलंत समच्या लक्षात घेऊन जागृत युवा मंच,अहेरी च्या वतीने कृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधे पत्रके वाटून हूंडा प्रथेचा निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकाच्या माध्यमातून युवकांना हुंडाबंदी विषयी माहिती देण्यात आली. पत्रकात म्हटले आहे की, हुंडाप्रथेमुळे कित्येक वैवाहिकाना आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. कित्येक स्त्रियांना वैवाहिक जीवनातुन बाहेर पडावे लागते. आजचा तरुण, युवा हा स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. युवकानी स्वतः आपल्या बुद्धी प्रमेयाचा बढावर विचार करुन हूंडा प्रथेस विरोध करावयास पाहिजे. कारण जोपर्यंत हुंडाप्रथेप्रती युवकांच्या मानसीकतेत बदल घडून येणार नाही,तोपर्यंत समाज परिवर्तन होणार नाही. त्यासाठी युवकांनी रजिस्टर मेरेज, आंतरजातीय विवाह, वधू वर सूचक मंडळ यांना प्राधान्य द्यायला पाहिजे शिवाय शासनाने हूंडा प्रतिबंधक कायददा अधिक सक्त करून पोलीस प्रशासन विभागात विशेष अधिकारी नेमावयास पाहिजे. सदर कार्यक्रम नागेपल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्राच्या यशस्वितेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर,सचिन खोब्रागडे, रवि दुर्गम,मंगेश सलामे,रवि गज्जलवार,पोचंना मूडमाडीगेला,मोहन जंगम,सुधाकर गूरूनूले,पवन सडमेक,अमित बावणे,दिनेश बूरम्वार,विजेंद्र शील,कु. रेखा डे,कु.प्रियंका मीटपल्लीवार, कु.शिवानी बिश्वास आदि जागृत युवा मंचच्या शिष्टमंडळाने सहकार्य केला.

सेवाग्राम आश्रमला भेट




3/06/2016 आज वर्धा येथील सेवाग्राम प्रतिष्ठानला माझी पहिली भेट. एक रमणीय पर्यटन स्थळ बघून बरं वाटलं. सेवाग्राम प्रतिष्ठान ऐतिहासिक स्थळ आहे. येथील ज्येष्ठ साधक पांडुरंग थूल हे गेल्या 20 वर्षापासुन निस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. त्यांच्या सोबत रंगलेली चर्चा आणि काही रहस्यमय गोष्टी सांगताना क्षण...!!
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमला या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद येथील अभिप्राय पुस्तिकेत झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक पर्यटक येथे नोंद न करता भेट देवून गेल्याचेही वास्तव आहे.
दक्षिण आफ्रिकेनंतर भारतात गांधीजीनी वेगवेगळे सत्याग्रह केले. स्वातंत्र्य आणि रचनात्मक कार्यक्रमाची दिशा याच सेवाग्राम आश्रमातून ठरविल्या गेली. गांधीजीचे दहा वर्षांचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते. यामुळे आश्रमातून झालेली कामे आणि बैठकांची माहिती येथील साधकांकडून पर्यटक म्हणून घेताना वेगळा अनुभव आला...


*हुन्डा बळी झालेल्या एका निष्पाप मुलीचं आपल्या बाबाला पत्र...*




तीर्साथरुप बाबास, सा. नमस्कार...
    बाबा,मला खूप आठवण येतेय तुमची. कशे आहात तुम्ही? वीसरलात काय मला माझी आठवण येते का कधी ? बाबा अजुनही चांगल आठवतं. मी लहान असताना तुम्ही ऑफिस मधे जायचात, तेंव्हा मी तुमची सतत वाट बघत असायचे. केव्हा माझे बाबा घरी येतील आणि माझ्या सोबत खेळतील. तुम्ही यायचात माझ्यासाठी खाउ घेउण आणि मी तुम्हाला आनंदाने मिठी मारायचे. त्या मिठीत माझ अक्ख जग सामावलं असायचं. बाबा , आठवतं का तुम्हाला,तूम्हच्याच बोटाचा आधार धरून चालायला शिकले होते मी. धडपळून पडायचे तेव्हा माझ्या पेक्षा जास्त तुम्हाला त्रास व्हायचा. तुम्ही मला मुलगी नाही तर मुलगा समजायचात. तूम्हच्याच पाउलावर पाउल ठेवून मोठे झाले मी. लग्नाच्या उम्बरठ्यावर उभी होते. स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असतानाही तुमच्या शब्दापलीकडे जाण्याचा कधी प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण तुमचे संस्कार होते माझ्यावर.
          बाबा,लग्न मंडपात हुन्ड्याच्या दावणीला बांधून तुम्ही माझ्यापासून स्वतःची सुटका करून घेतलात हे खरे,पण मला मात्र आयुष्यभर मरणाच्या कड़ा सोसाव्या लागल्यात. लग्नानंतर हुन्ड्यासाठी सासरकडून रोज-रोज होणारा शारीरिक व मानसिक अत्याचार मला सहन होत नव्हता. तेव्हा वाटायचं, धावत येऊन मनातलं सारं तुमच्यापाशी मांडाव. पण विचार यायचा, "माझ्या बाबांनी तडजोड करून केलेलं माझ लग्न, हे लग्न मोडण्याचा मला काहीयेक अधिकार नाही." म्हणून मुकाट्याने अन्याय सहन करत गेले. नुसतं माझा चेहरा बघून वेदना ओडखणार्या माझ्या बाबाला माझ्या मनातील व्यथा कशी कडू शकली नाही ह्यातच मला दुःख वाटतेय.
         बाबा, मी आत्महत्या केली नाही हो... हुन्ड्याच्या हव्यासापोटी बळजबरीने मारलं मला. मी केविलवान्यापणे गयावया करत होते, पण माझी दया आली नाही त्यांना. बाबा मी मुलगी आहे म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही का ? ह्या जन्मी मला जे मिळालं नाही ते मला पुढच्या जन्मी हवं आहे. मला परत तूम्हच्या मिठीत यायच आहे,तुमच्या सोबत खेळायचं आहे, तेच बोट धरून इवल्याशा पायानी चालायला शिकायचं आहे. पण बाबा एक कराल का हो माझ्यासाठी ? जे तुम्ही या जन्मी केलात ते पुढच्या जन्मी करू नका. हुन्डा देऊ नका आणि हुन्डा घेऊ नका. हुन्डा प्रथेचा विरोध करा. पुढच्या जन्मी तुम्हीच मला बाबा म्हणून हवे आहात.मी परत जन्म घेईन तुमची मुलगी बनून,पण हुन्डाबळीने पिडलेल्या ह्या कलियूगात नाही, तर शोषणमुक्त व समानता युक्त त्या परिवर्तन युगात...
   

                               तुमची लाडकी छकुली

***********************************************************************
आज देशात दर एक तासाला हुन्डाबळी होत आहे. हुन्ड्यापायी छळ होऊन कित्येक युवतींना वैवाहिक जीवनातुन बाहेर पडावे लागत आहे. हुन्डा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुन्डा घेणे अथवा देणे कायद्याने गुन्हा संतांना देखील आज शिवराय,आम्बेड्करांच्या देशात हुन्डा ही प्रथा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजात कायम आहे. आज हुन्ड्याप्रती प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण मानसिक बदल घडवून आणल्या शिवाय सामाजिक परिवर्तन घडून येणार नाही. आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात. तरुणांनो विचार करा. हुन्डा प्रथेचा विरोध करा. हे पत्र वाचून कुणा एकानेही हुन्डाप्रथेचा विरोध केला तर आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही समजू,धन्यवाद...!

                                       *सौजन्य*
                              जागृत युवा मंच,अहेरी
आदिवासी शिक्षिका छाया सड्मेक ह्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आरोपीस  कठोर शिक्षा व्हावी म्हणून तहसीलदार मार्फत पोलीस अधीक्षक  याना निवेदन दिले.


🔹सार्वजनिक स्वच्छतेसाठी नगराध्यक्षाना निवेदन 🔹



देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी अनेक कार्यक्रम व उपक्रम देशात राबवून व्ययक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.त्याला संपुर्ण देशात चांगला प्रतिसाद मीळाला...पण याला अपवात ठरत आहे अहेरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे..स्थानीक विकास निधीतुन सार्वजनिकशौचालय, मुत्रीघर व स्थानगृह बांधण्यात आले.पण याचा उपयोग जणतेला न होता कचरा साठविण्यासाठी केला जात आहे.येथे टाकाऊ कचरा भरलेला आहे. डुकरे व अन्य जनावरे या ठीकाणी येत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याबीकडे नगरपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.येथे स्वच्छतेची ऐसी तैसी झाली आहे. ...शौचालय,मुत्रीघर व स्थानगृह याची डागडुजी करुन येथील परीसर स्वच्छ करण्यात यवा तसेच शहराची लोकसंख्या विचारात घेथा  नवीन शौचालय बांधण्याथ यावे बाबतचे निवेदन जागृत युवा मंचाचे अध्यक्ष राहूल पेंढारकर,संतोष तलांडे,मारोती मडावी, सोनू तदांडे,विकास मुंजमकर, पोपटलाल कन्नाके यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांना दिले आहे...."आपण प्रत्यक्ष लक्ष घालुन येथील स्वच्छता करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. सध्या रोजगारासाठी मजूर हे बाहेर गावी गेले आहेत.त्यामुळे मजुराचा तुटवटा आहे. तरी सुद्धा नगरपंचायतीच्या नियमीत कर्मचारी यांचा उपयोग करुन या कामाला प्रथम प्राधान्य दिले जाईल.".असे आश्वासन नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी दिले.







...अन जागृत युवा मंच चे पदाधीकारी आले धाऊन..!




अहेरी येथील युवक श्रीनिवास उपलवार वय वर्ष 28, हॉकी ग्राउंड येथे मीना बाजारात डोन्गी वरून उसरुण खाली कोसडला. लगेच जागृत युवा मंचचे पदाधीकारी राहुल पेंढारकर, विकास मुंजंकर,दिपक सुनतकर यांच्या निदर्शनास येताच त्यानी घटणास्थळी पोहचून त्या युवकाला बाईक वरून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अॅडमिट केले. वैद्यकीय तपासणी नंतर गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयामध्ये स्थलांतरीत कारण्यात येणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी ड्रा हकीम यांनी दिली.


जागृत युवा मंच तर्फे भव्य निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा

दि.10/9/016 राहूल पेंढारकर यांच्या पुढाकाराने "जागृत युवा मंच",अहेरी तर्फे राणी दुर्गावती विध्यालय,आलापल्ली येथे "वेगळा विदर्भ काळाची गरज" या भव्य निबंध स्पर्धेचा "बक्षिस वितरण सोहळा" तथा "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित. विध्यार्थ्याना पारितोषिक वितरण करतांना मान्यवर व जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ.















अहेरी येथे एम.पी.एस.सी. चे नवीन केंद्र स्थापन करा- जागृत युवा मंच ची मागणी.


एस.डी.ओ. च्या अनुपस्थितीत मा. नायब तहसीलदार नेरलवार मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले निवेदन...! निवेदन देतांना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ.



चिमण्यांसाठी तयार केले घरटे (लोकमत)-जागृत युवा मंचचा उपक्रम



अहेरी : शहरातील स्लॅबच्या घरांमुळे चिमणीचा निवारा हरविल्या गेला आहे. त्यामुळे शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. अहेरी येथील जागृत युवा मंच तर्फे चिमणीचे घरटे तयार करून ते घरटे झाडावर टांगले आहे. या घरट्यांच्या माध्यमातून चिमण्यांना हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे.चिऊताईची गोष्ट सांगत आजी किंवा आई आपल्या लहान बाळाला जेऊ घालत होती. बाळाच्या हातून पडलेले खाद्य पदार्थ टिपणारी चिऊताई मात्र शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. चिमणी हा पक्षी घनदाट जंगलामध्ये आढळत नाही व त्या ठिकाणी तो घरटेही बनवित नाही. गावाच्या सहार्‍यानेच चिमणी राहते. चिमणीला हक्काचे घरटे मिळाल्यास त्यांची संख्या वाढेल. या उद्देशाने राहूल पेंढारकर, अरविंद सडमेक, मोंटू पोरतेट या हौशी युवकांनी चिऊताईचे घरटे तयार करून ते घरटे वॉर्डातील नागरिकांच्या घरी सुरक्षितस्थळी ठेवले जात आहेत. घरट्या बरोबरच चिमण्यांना पाण्याची व्यवस्थाही युवकांनी केली आहे.

जनहितार्थ मागणी करिता निवेदन देतांना आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना