शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

उमगल्या भटक्या-विमुक्तांच्या यातना...


-चंद्रपुरात 'यातना' नाटकाचा यशस्वी प्रयोग..











चंद्रपूर/

आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर प्रस्तुत. मायबोली झाडीपट्टी रंगभूमी निर्मीत, राहुल पेंढारकर लिखीत ' यातना ' या नाटकाचा चंद्रपूर येथे यशस्वी प्रयोग पार पडला. 

डब्लू. सी. एल. गणेश मंडळ यांच्या सौजन्याने नाट्यप्रयोगाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले होते. गणेश चतुर्थी पासून तर गणेश विसर्जन पर्यंत गणेश मंडळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असते. औचित्य साधून सदर नाटकाचे निःशुल्क प्रयोग आयोजित करण्यात आले. प्रसंगी भर पावसात नाटकाला हजेरी लावून, रसिक माय बापांनी त्यांचा नाटकाविषयीचा जिव्हाळा प्रकट केला. गणपती - पोळा - दिवाळी पासून झाडीपट्टीच्या नाटकांची सुरुवात होते. येथील नाट्य रसिकांसाठी नाटक म्हणजे सुगीचा दिवस असतो. त्यामूळे रसिकांनी नाटक संस्कृती जोपासावी, असे लेखक राहुल पेंढारकर यांनी प्रेक्षकांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाटकाचे निर्माता सारिका यश. उराडे, दिग्दर्शक संतोष बारसागडे असून, सिने. अभिनेत्री निशा धोंगडे, राहुल पेंढारकर, संतोष बारसागडे, यश निकोडे, बि. अनिरुद्ध, अरविंद वाघधरे, अतुल चौधरी, टिना उराडे, किर्ती मरस्कोल्हे, सपना आवडे आदी कलावंत प्रमुख भूमिकेत होते.