गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७


दि. 31/08/2017 ड्रा नैताम मॅडम, आलापल्ली यांनी जागृत युवा मंच च्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन एकूण 17 ज्ञानवर्धक पुस्तक गरजू साठी दान केल्याबद्दल त्यांचे जागृत युवा मंच तर्फे विशेषभार.

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

 दि.30/08/2017 मा. श्री सुरेशजी दोंतुलवार सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,चेरपल्ली (रा.अहेरी) यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 13 पुस्तकं (ज्ञान वर्धक व शैक्षणिक) दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार.
पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी  

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

आज दि. 29/08/2017 छाया उईके मॅडम यांनी जागृत युवा मंचच्या #पुस्तक_दान_कार्यक्रमात सहभागी होऊन आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने लेखक-ओहोळ डी. आर. तब्बल 12 पुस्तक दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार. 
पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी 

शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

*भव्य पुस्तक दान कार्यक्रम* एक हात मदतीचा...


आज आम्ही आपल्याकडे एक मदतीचा हात मागण्यासाठी येत आहोत. आम्ही सर्व सामाजिक प्राणी आहोत. आमचं जगणं एकमेकांवरच निर्भर करतं. अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या प्रमुख मूलभूत गरजा आहेत. पण आता जगण्याची व ह्या गरजांची व्याख्या बदलायला हवी असं आम्हाला वाटू लागलय. वाचन हे सूद्धा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण जगण्यासाठी स्पर्धेत उतराव लागतं आणि स्पर्धेत टिकण्यासाठी आधी पुस्तकं वाचावी लागतात ही वास्तविकता आहे.
आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी आम्ही एक हात मदतीचा पुढे करूयात. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत  जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही आम्हाला तुमच्या हातांनी सूपूर्त करा. ती पुस्तकं आम्ही उपयोगात आणू. तुमचच पुस्तक तूम्हच्या हातांनी गरजूना सप्रेम भेट देऊ. त्यामुळे त्यांना गैर वाटणार नाही हे नक्कीच आणि त्याच गरजू मुलांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान ठराल. आपला समाज हा दोन गटात विभागतो एक "आहे रे" आणि दुसरं "नाही रे" ह्यात आहे कडच्या लोकांकडे द्यायला बरंच देण्यासारख असतं पण मध्यम सापडत नाही. आज जागृत युवा मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येत आहोत. आपण दिलेल्या पूस्तकाना योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचवीन्याची जवाबदारी आमची. ह्यात कुठलही गैरप्रकार होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो. नक्की विचार करा आणि आमच्या बानधवांसाठी एक हात मदतीचा हात दया...!

*ज्या विचारवंत लोकांना अशा गरजुंसाठी प्रामाणिकपणे पुस्तक दान करण्याची इच्छा आहे त्यानी पुढील दूरध्वनीवर सम्पर्क साधावा. स्पर्धा परीक्षा व सामाजिक ज्ञानवर्धक पुस्तके स्वीकारले जातील. तुमच्या आठवणीतील ह्या सुवर्ण क्षणांना आम्ही फोटो स्वरूपात आमच्या सोशियल साईट वर प्रकाशित करू.*

सम्पर्क:- राहुल पी पेंढारकर 7057606384,9421078110, सचिन खोब्रागडे 7304595155, रवि गज्जलवार 9405565324, विजय गड्डम्वार 9404247639

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

*जागृत युवा मंचचा अनोखा उपक्रम.. *मतीमंद व मुकबधिर मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन...!!!

जागृत युवा मंचच्या वतीने चाणक्य मतीमंद निवासी विद्यालय व एकलव्य मूकबधिर निवासी विद्यालय,नागेपल्ली येथे एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. जीवनप्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना रक्षाबंधन सण अनुभवता यावा ह्याकरीता मैत्रीच्या नात्याबरोबरच बहीण भावाच्या अतूट बंधनाने जागृत युवा मंचचा परिवार एकत्र आला. बहीण भावाचे अतूट नाते अनुभवता यावे म्हणून जागृत युवा मंचच्या मुलींनी मतीमंद व मूकबधिर मुलांना राख्या बांधल्या. व जागृत युवा मंचच्या मुलांनी त्यांच्या कडून बांधून घेतल्या. मुलांना याप्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले.अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे विद्यालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जागृत युवा मंचने मतीमंद व मूकबधिर मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अपुलकीची व जवळीकतेची प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केली व मुले स्वतःचे पालक आल्याप्रमाणे आनंद व्यक्त करत होते. जागृत युवा मंचचा परिवार जाण्यास बाहेर पडटाच "नका जाऊ" असं म्हणून त्या मुलांनी जागृत युवा मंचला आडवून धरल होतं. ह्या वातावरनाने विद्यालयातील शिक्षक सूद्धा भारावून गेले. कार्यक्रमा प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,साजन ऊइके,प्रीतम पेटेवार,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,नागेश सिंका,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास,निशा खोब्रागडे,सोनाली भट,विद्या राऊत, रागिनी ऊइके आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळाची उपस्तीत होते.