शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

*भव्य पुस्तक दान कार्यक्रम* एक हात मदतीचा...


आज आम्ही आपल्याकडे एक मदतीचा हात मागण्यासाठी येत आहोत. आम्ही सर्व सामाजिक प्राणी आहोत. आमचं जगणं एकमेकांवरच निर्भर करतं. अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या प्रमुख मूलभूत गरजा आहेत. पण आता जगण्याची व ह्या गरजांची व्याख्या बदलायला हवी असं आम्हाला वाटू लागलय. वाचन हे सूद्धा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण जगण्यासाठी स्पर्धेत उतराव लागतं आणि स्पर्धेत टिकण्यासाठी आधी पुस्तकं वाचावी लागतात ही वास्तविकता आहे.
आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी आम्ही एक हात मदतीचा पुढे करूयात. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत  जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही आम्हाला तुमच्या हातांनी सूपूर्त करा. ती पुस्तकं आम्ही उपयोगात आणू. तुमचच पुस्तक तूम्हच्या हातांनी गरजूना सप्रेम भेट देऊ. त्यामुळे त्यांना गैर वाटणार नाही हे नक्कीच आणि त्याच गरजू मुलांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान ठराल. आपला समाज हा दोन गटात विभागतो एक "आहे रे" आणि दुसरं "नाही रे" ह्यात आहे कडच्या लोकांकडे द्यायला बरंच देण्यासारख असतं पण मध्यम सापडत नाही. आज जागृत युवा मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येत आहोत. आपण दिलेल्या पूस्तकाना योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचवीन्याची जवाबदारी आमची. ह्यात कुठलही गैरप्रकार होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो. नक्की विचार करा आणि आमच्या बानधवांसाठी एक हात मदतीचा हात दया...!

*ज्या विचारवंत लोकांना अशा गरजुंसाठी प्रामाणिकपणे पुस्तक दान करण्याची इच्छा आहे त्यानी पुढील दूरध्वनीवर सम्पर्क साधावा. स्पर्धा परीक्षा व सामाजिक ज्ञानवर्धक पुस्तके स्वीकारले जातील. तुमच्या आठवणीतील ह्या सुवर्ण क्षणांना आम्ही फोटो स्वरूपात आमच्या सोशियल साईट वर प्रकाशित करू.*

सम्पर्क:- राहुल पी पेंढारकर 7057606384,9421078110, सचिन खोब्रागडे 7304595155, रवि गज्जलवार 9405565324, विजय गड्डम्वार 9404247639

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: