शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन.


.

सर्वसाधारण व विशेष घटक योजने अंतर्गत प्रथमच अहेरी येथे अनुसूचित जातीतील व सर्वसाधारण इतर जातीतील महिला व युवतींकरीता गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली मार्फत सदर कार्यक्रम घेण्यात येते. यामार्फत बेरोजगाराना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश असतो. कार्यक्रमातून शासकिय योजना व अनुदान विषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा निरीक्षक श्री बढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक पवन भांडेकर,प्रशिक्षिका रेखा सिंग, कार्यक्रम समन्वयक, जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार,राकेश रापर्तीवार,विजय गड्डमवार,गीरीधर दलाई आदि उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: