बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

पण तिच्या शिक्षणाच काय..?

दि. 13 नोव्हेंबर 2017 वेळ 10:30 मी वडसा वरून नागपूर ला जायला निघालो आहे. नागभीढ स्टेशन वर मला एक लहानशी मुलगी खेळत असताना दिसली. तिचे कापड मडलेले होते. मी तिला तीच नाव विचारल पण ती गप्प होती. हे बघून तिचे वडील माझ्या जवळ आले आणि त्यानी माला सांगितल की त्या मुलीची आई हरवली आहे. त्यांना बल्लारशाला त्या मुलीच्या मामाकडे जायचं आहे पण आमच्याकडे तिकिट काढायला पैसे नाहीत, मी त्यांना तिकीट काढून दिल. मी त्यांना विचारल  तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे ? तेव्हा तो सांगत होता माला माझ्या मुलीला शाळेत घालायचय पण माझी परिस्थिती वाईट आहे. मला फक्त त्यांना तिकीट काढून देता आलं ह्याचं समाधान वाटतंय, पण त्या मुलीच्या शिक्षणासाठी काहीच करू शकलो नाही ह्याच मात्र दुःख होतय. "ती" आणि तिचे वडील गावी पोहचतील पण ; तिच्या शिक्षणाच काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: