गुरुवार, ४ जुलै, २०१९

गरजू मुलांना कपड्यांचे वाटप

राहूल पेंढारकर ह्यांच्या वाढदिवसा निमीत्य. गरजू मुलांना कपड्यांचे वाटप जागृत युवा मंच अहेरी / चंद्रपूर तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या वतीने 
चंद्रपूर येथील रमाबाई नगर मधे 50 गरजू मुलांसाठी कपडे वाटप करण्यात आले. चंद्रपूर येथील रमाबाई नगरच्या झोपडपट्टी परिसरात अनेक कामगार लोक राहतात. या वस्तीत जीवनावश्यक वस्तू सोबतच मूलभूत गरजा व शिक्षणाचा अभाव आढळून येतो. येथील लहान गरजू मुलांपर्यंत जाऊन त्यांची मदत करताना जागृत युवा मंच तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळच्या पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद झाला. वस्तीतील पालकांनी या सामाजिक संघटनांचे आभार मानले आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका उराडे, राहूल पेंढारकर, प्रशांत रामटेके, राशी उराडे, राहूल रामटेके, किनारा खोब्रागडे, अंकित आदिनी, मयुरी आत्राम  सहकार्य केले.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: