चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रोशना आत्राम ह्या अनाथ मुलीचे विवाह 'भिक्कू भदंत चंद्रमणी कुटी' येथे बौद्ध पद्धतीने पार पडले. लहान असतांनाच रोशनाचे आई वडील दगावले, त्यानंतर तिच्या नातेवाईकानी तिची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. तिने स्वबळावर कसे-बसे आपले नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. लॉक डाउन मधे रोशनाला भविष्याची चिंता भासू लागली होती. जागृत युवा मंच व सर्वांगीण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाला ह्याची माहिती मिळताच त्यांनी रोशनाला दत्तक घेतले व तिचे विवाह पारंपारिक बौध्द पद्धतीने लाऊन दिले. सदर विवाह राहुल पेंढारकर, सारिका यश उराडे, भंतेजी धम्माघोष मेत्ता, डॉ. गुलवाडे, प्राध्यापक विसादास भाडके, कृष्णा जी कूंडू, शुदोधन जी मेश्राम, श्रूती राकेश लोणारे, टीना उराडे, सुमीत रामटेके आदि लोकांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
लग्न पत्रीकेतून दिला हुंडा मुक्त विवाहाचा संदेश
लग्न म्हंटले की हुंडा आलाच;हुंडा प्रथेमुळे कीत्येक विवाहित स्त्रियांचे जीवन उध्वस्त झाले आहे.परंतु हुंडा घेण्याची प्रथा समाजात काही कमी झालेली दिसत नाही. म्हणून हुंडा प्रथेचा विरोध करत लग्न पत्रिकेत भारतीय क्रांतिकारकांचे फोटो दर्शवून हुंडा मुक्त विवाहाचा संदेश देण्यात आला.
वधूचे स्टेटमेंट :
माझ्या सारख्या अनाथ मुलीला बहीण म्हणून दत्तक घेऊन विवाह करून देण्याची जबाबदारी राहुल पेंढारकर यांनी स्वीकारली तर सारिका यश उराडे यांनी आई वडिलांची भूमिका बजावत आशीर्वाद दिला. हे कार्य करण्यास काळीज आसवं लागतं आज समाजाला अशा समाजकार्यकर्त्याची गरज आहे. मी जीवनभर त्यांची ऋनी राहील.
- रोशना आत्राम,वधू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा