रविवार, २० मार्च, २०२२

*आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर आदिवासी बोली भाषेचे जतन करा*- प्रबोधनकार राहुल पेंढारकर

गडचिरोली /

आदिवासी गोंडवन गोंड महासभा तथा आदिवासी स्वायत्त परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संविधान सभेचे सदस्य तथा पेसा कायद्याचे जनक जयपाल सिंह मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त गडचिरोली येथील गोंडवाना कार्यालयात  चंद्रपूर येथील आदिवासी प्रबोधन कला मंचच्या वतीने 'गोंडवन पेटलं आहे' या प्रबोधनपर संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंचावरुन प्रबोधन करत असतांना प्रबोधनकार राहुल पेंढारकर यांनी आदिवासी संस्कृती , इतिहास, शिक्षा, संविधान, जल, जंगल, जमिन या विषयावर भाष्य केले. ते म्हणले की,  'आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर आदिवासी बोली भाषा जतन केली पहिजे, कारण भाषा जिवंत असली तर संस्कृती जिवंत राहील आणि संस्कृती जिवंत असली तर इतिहास जिवंत राहील, त्यामुळे आदिवासींनी आपल्या बोली भाषेचे जतन करणे गरजेचे आहे.'पुढे ते असेही बोलले की, 'उच्च शिक्षा विभूषित जयपाल सिंह मुंडा ह्यांनी संविधान निर्मितीच्या वेळेस आदिवासींचे प्रतिनिधित्व करून आरक्षण लागू करण्याचा प्रस्थाव संविधान सभेत मांडला शिवाय घटना समितीचे ते सदस्य व पेसा कायद्याचे जनक सुद्धा होते.त्यामुळे आदिवासी समाजातील दुसरे आंबेडकर म्हणुन सुद्धा जयपाल सिंह मुंडा ह्यांना ओळखले जाते.आदिवासींना ह्याचा विसर पडू नये.' 
  या प्रसंगी गोंडवन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, गोंडवन गोंड महासभाचे महासचिव दिवाकर पेंदाम, प्रबोधनकार राहुल पेंढारकर,सामाजिक कार्यकर्ता सारिका उराडे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी हजारो आदिवासी बांधवानी  रेला नृत्य करून आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात केले.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: