मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

*राहुल पेंढारकर राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित*

 







गडचिरोली /

राज्य सरपंच परिषद मुंबई ( Mumbai) यांच्यातर्फे यंदापासून राज्यात ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या, त्यासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, गावे, सरपंच, समाजसेवक व ग्रामसेवकांना पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून ऐकून 950 प्रस्ताव सादर करण्यात आले होते, परंतु चारच पुरस्कार सामाजिक क्षेत्राला जाहीर करण्यात आले. आदिवासी अतिदुर्गम भागात केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत राहुल पेंढारकर यांना, ' राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार' पद्मश्री पोपटरावजी पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, सरचिटणीस विकास पाटील, आबा सोनवणे, अंजना येवले, ज्ञानेश्वर पठारे, नाना डोंगरे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी संचालनालयाचे सह-आयुक्त उज्वल चव्हाण, कृषी (Agriculture) विभागातील सहसंचालक रफिक नाईकवाडी यांचा ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तसेच राज्यातील दहा सरपंच, पाच आदर्श ग्रामपंचायती व पाच आदर्श ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला. २२ एप्रिल रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या हस्ते व पद्मश्री पोपटराव पवार (Popat Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

शेती, (Farmer) सहकार, ग्रामविकासासाठी योगदान दिल्याबद्दल सरपंच (Sarpanch) परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री आमदार सुरेश धस, प्रशांत बंब व नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्शलोक प्रतिनिधी’ पुरस्कार (‘Yashwantrao Chavan Adarshlok Pratinidhi’ Award) जाहीर करण्यात आले. या शिवाय ‘उत्तम प्रशासक’ म्हणून तीन प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व आदर्श ग्रामपंचायतींनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. आदर्शगाव हिवरेबाजार (Hivare Bajar) (ता. नगर) येथे २२ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले.
















कप्शन :राहुल पेंढारकर यांना , 'राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार' प्रधान करतांना पद्मश्री पोपटराव पवार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: