सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

*झाडीपट्टीच्या 'शर्वरी'ची आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात भरारी.* लघुचित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद !

चंद्रपूर/ 

      मायबोली झाडीपट्टी प्रॉड्शन्स प्रस्तूत, राहुल पेंढारकर दिग्दर्शीत 'शर्वरी' हा लघुचित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असुन चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा विषय घेऊन तयार करण्यात आलेले लघुचित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरतांना दिसत असून मुंबा आंतररष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात लवकरच सादर होणार असल्याची माहिती अभिनेते-दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी दिली आहे.

         जगात अनेक प्रकारचे आजार आहेत.आजार केवळ शारीरिकच नसतात, तर मानसिक आजारही बरेच आहेत, जे आपल्याला माहित नसतात किंवा ओळखता येत नाहीत. असाच एक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया एक जटिल आणि गंभीर मानसिक आरोग्याचा विकार आहे, जो मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम करतो. लोकांचे मन भ्रष्ट होऊ लागते, त्यांच्या डोक्यात भ्रामक विचार, उच्छृंखल वर्तन आणि विचार येतात. हा विकार एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो आणि त्याला आजीवन उपचाराची आवश्यक असते. उपचार न घेतल्यास मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

    'शर्वरी ' लघूचित्रपटातून ''स्किझोफ्रेनिया पासून सावधान!" असा संदेश देण्यात आला आहे. आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळाने हया लघूचित्रपटाची निर्मिती केली असुन प्रिती राहुल पेंढारकर यांची निर्मिती संकल्पना आहे.  जगदीश नंदुरकर, टिना उराडे, ज्योती रामावार, सारिका उराडे, राहुल पेंढारकर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. 



स्टेटमेंट : 

' स्किझोफ्रेनिया ' या आजारासंदर्भात जवळ- जवळ बऱ्याच लोकांना माहिती नाही. लघुचित्रपट बघून मला अनेकांचे फोन आलेत. अनेकांनी फिल्म बघून स्किझोफ्रेनिया आजरासंदर्भात जनजागृती केल्याबद्दल अभिनंदन केले. काही लोकांनी 'स्किझोफ्रेनिया नावाचा आजारच मुळात अस्तित्वात नाही', असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्या वेळेस मी त्यांना इंटरनेटवर स्किझोफ्रेनियाबाबत माहिती जाणून घेण्याचा सल्ला दिला. गोंडवाना विद्यापिठाला लघुशोध प्रबंध सादर करत असताना ' स्किझोफ्रेनिया ' या विषयावर लघुचित्रपट तयार करण्याची कल्पना मनात आली होती. स्किझोफ्रेनियापासून सावधान करणारी शर्वरी अज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय, ह्याचं आनंद होत आहे.

-राहुल पेंढारकर, अभिनेता-लेखक-दिग्दर्शक,











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: