बिरसा क्रांती दलच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात रावण पूजेचं ओचित्य साधून राहुल पेंढारकर यांचे 'गोंडवन पेटलं आहे' या सामाजिक संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिरसा क्रांती दलाच्या वतीने राहुल पेंढारकर व संचाचा सत्कार करण्यात आला.
आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या वतीने राहुल पेंढारकर हे आदिवासी समाजात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जागृती करण्याकरिता प्रबोधन करत असतात. हया कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत बिरसा क्रांती दलाच्या वतीने श्रीफळ व शाल देऊन हा सत्कार करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथजी मडावी संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. उद्घाटक डॉ. गजानन मेश्राम,माजी वैद्यकिय अधिकारी. प्रमुख अतीथी रंगराव काळे राज्य अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. गिरजा उईके राज्य अध्यक्ष बिरसा क्रांतीदल महिला फोरम. डि. बि. अंबुरे, राज्य उपाध्यक्ष, बिरसा क्रांती दल.
प्रभाकर गेडाम राज्य संघटक, बिरसा क्रांती दल. अशोक उईके
जिल्हाध्यक्ष / माजी नगरसेवक बिरसा क्रांती दल. विशेष अतिथी विजयसिंह मडावी अध्यक्ष, आदिवासी संघर्ष कृती समिती. किसनरावजी कोटनाके (मोकासी) अध्यक्ष, राष्ट्रीय सल्लागार गोंडवाना संरक्षण समिती. भारत आत्राम महासचिव, कृषी समिती विधानसभा. गजानन जुमनाके अध्यक्ष, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था. प्रमोद बोरिकर अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद, अशोक तुमराम अध्यक्ष, आदिजन चेलनेचा जागर. तालुका अध्यक्ष धनाराजजी कोवे आदी हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते.












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा