गडचिरोली :
राष्ट्रिय अनुसुचित जनजाती आयोग,भारत सरकार, दिल्लीचे सदस्य अनंता नायक यांच्या हस्ते राहुल पेंढारकर यांना पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या वतीने राहुल पेंढारकर हे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात सामाजिक सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसात अभ्यास दौरा सुरू असताना पेंढारकर यांची एन. सी. एस. टी. सदस्य अनंता नायक यांच्या दिल्ली येतील निवासस्थानी भेट झाली. प्रसंगी आदिवासींचे हक्क व अधिकार तथा शैक्षणिक धोरण यावर सखोल चर्चा करण्यात आली. नायक यांनी पेंढारकर यांच्या कार्याची दखल घेत, " स्वतंत्रता संग्राम मे जनजाति नायको का योगदान, एन. सी. एस. टी. माहिती पुस्तिका, Change in Faith is Change in Culture अशी पुस्तके भेट देऊन त्यांना सन्मानित केले. राहुल पेंढारकर हे झाडीपट्टी रंगभूमीचे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून काम करत आहेत. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा