मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

*जागृत युवा मंच तर्फे विद्यार्थी दिवस साजरा * अवांतर वाचनासाठी विद्यार्थ्याना दिला बाबासाहेबांच्या पुस्तकांचा खजिना





  महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर हा ड्रा बाबासाहेब आम्बेडकर ह्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून जाहीर केला होता.शिक्षण हेच उन्नतीचे साधन असल्यामुळे जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने पहिलाच विध्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शैलेश कोसरे सर, प्रमुख अतिथी म्हणून भगवंतराव महाविद्यालय येथील श्री महाकालकर सर, संत मानवदयाल विद्यालय येथील श्री निकोडे सर व रेखा डे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुस्तक वाचन बरोबरच अवांतर वाचन देखील तेव्हढेच महत्वाचे आहे हे ओळखुन जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने विद्यार्थ्यांना बाबासाहेब आम्बेडकर व तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या पुस्तकांचा खजिना शुभेच्छा स्वरूपात देण्यात आला. वाचनातून परिवर्तन घडून यावे आणि भावी पिढी ही समतावादी विचारांची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.याप्रसँगी विचारमंचावर अध्यक्ष स्थानावरून बोलतांना श्री शैलेश कोसरे ह्यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हंटले की, बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व खूप महान होते विद्यार्थयानी त्यांचे अनुकरण करवायास पाहिजे. वाचनातून विचार वाढीस येतात आणि स्व चा विकास होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास करण्यासाठी वाचनालयाची निर्मिती करायला पाहिजे, अशे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, अलोने दादा, हर्षा अलोने, स्नेहल जॉब, शीवानी बीस्वास, रागिनी ऊइके यांनी सहकार्य केला. संचालन सौ. गीता अलोने, प्रास्तवीक चेतना चालूरकर तर आभार राहुल पेंढारकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: