सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

बाल आनंद शिबिराचा तिसरा दिवस

दिनांक 27/08/2020 

पाऊस येत होता. वाटलं मुलं येणार नाहीत. पण  मुलांची गर्दी पटांगणावर न जमता थेट माझ्या घरी जमली. मग काय, माझ्या घरच्या फोर्च मधे बसून आम्ही शिबिर सुरु केलं. निबंधाचा विषय होता 'शाळा सुरु झाली तर...?' मुलांनी कल्पना करून लिहिण्यास कुठलिच कसरत सोडली नाही. 

           त्यानंतर 'microscope' (सूक्ष्मदर्शिका) बद्दल माहिती जाणून घेता आली. येवढंच नाही, तर त्याचा उपयोग का? , कशासाठी ? आणि कसा करायचा ह्याबद्दल मुलांना प्रयोगातून जाणून घेता आलं..परत चॉकलेटची मज्जा आणि उदयाची वाट...













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: