शनिवार, २० मे, २०१७

चिमण्यांसाठी तयार केले घरटे (लोकमत)-जागृत युवा मंचचा उपक्रम



अहेरी : शहरातील स्लॅबच्या घरांमुळे चिमणीचा निवारा हरविल्या गेला आहे. त्यामुळे शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. अहेरी येथील जागृत युवा मंच तर्फे चिमणीचे घरटे तयार करून ते घरटे झाडावर टांगले आहे. या घरट्यांच्या माध्यमातून चिमण्यांना हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे.चिऊताईची गोष्ट सांगत आजी किंवा आई आपल्या लहान बाळाला जेऊ घालत होती. बाळाच्या हातून पडलेले खाद्य पदार्थ टिपणारी चिऊताई मात्र शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. चिमणी हा पक्षी घनदाट जंगलामध्ये आढळत नाही व त्या ठिकाणी तो घरटेही बनवित नाही. गावाच्या सहार्‍यानेच चिमणी राहते. चिमणीला हक्काचे घरटे मिळाल्यास त्यांची संख्या वाढेल. या उद्देशाने राहूल पेंढारकर, अरविंद सडमेक, मोंटू पोरतेट या हौशी युवकांनी चिऊताईचे घरटे तयार करून ते घरटे वॉर्डातील नागरिकांच्या घरी सुरक्षितस्थळी ठेवले जात आहेत. घरट्या बरोबरच चिमण्यांना पाण्याची व्यवस्थाही युवकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: