राष्ट्रीय किर्तनकार व प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे श्री सत्यपाल महाराज(सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर) यांच्यावर मुम्बई दादर येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी प्रबोधन करीत असताना चाकूने प्राणघातक हल्ला झाला. जखमी सत्यपाल महाराज यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यपाल महाराज ह्यांच्यावर हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा युवक 28 वर्षाचा असून मुम्बई येथील रहिवाशी आहे. त्याने मध्याधुंद अवस्थेत फोटो काढण्याचा ढोंग करून सत्यापाल महाराज ह्यांच्या पोटावर चाकूने वार केला होता. महाराज यानी सामाजिक प्रबोधन करीत असतांना कुणाल किशोर जाधव याने महाराजांवर हल्ला का करावा ? ह्यामागील उदेश्य काय ? ह्या सर्वघटीत प्रकरणामागिल मुख्य सूत्रधार कोण ? ह्याची कस्सून चौकशी करण्यात यावी शिवाय महाराष्ट्रातील प्रबोधनकार व कीर्तनकार ह्यांच्या पाउलापाऊली संरक्षणाची जाबाबदारी पोलिस प्रशासनाकडे देण्यात यावी. ह्याकरीता जागृत युवा मंच, अहेरीच्या वतीने आतीरीक्त जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना निवेदन देण्यात आले व प्रतिलिपि मा. महामहिम राज्यपाल ह्यांना पाठविण्यात आली.निवेदनात म्हंटले आहे की,"सत्यापाल महाराज हे बुद्ध,शिवाजी,बिरसा, तुकडोजी,शाहू, फुले, आम्बेड्कर यांची विचारधारा घेऊन देशभर प्रबोधन करून जनजग्रुती करीत असतात. सत्यपाल महाराज यांचे कीर्तन हे विषमतावाद, अंधश्रद्धा ह्यांवर घाव घालणारे आहे. सत्यपाल महाराज ह्यांच्यावरील हल्ला हा पानसरे,दाभोडकर,कलबुर्गी ह्यांच्या प्रमाणेच कट रचून करण्याचा भयाण प्रयत्न होता हे दिसून येत आहे, त्यामुळे तात्काळ घटनेचा प्रकार उघडकीस आणून आरोपीस योग्य ती शिक्षा करावी. निवेदन देतांना जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर,सचिन खोब्रागडे,रवि गज्जल्वार,विजय गड्डम्वार,सुमित सिडाम, राजू येंगंटीवार, कु. प्रियंका मीटपल्लीवार,कु विजया खोब्रागडे,कु सुजाता खोब्रागडे आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदार सौ. नेरलवार मॅडम यानी स्वीकारले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा